Avatar 2 Advance Booking: 'अवतार'ची गोष्टच वेगळी, महिनाभर अगोदरच बुकींग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avatar 2 Advance Booking

Avatar 2 Advance Booking: 'अवतार'ची गोष्टच वेगळी, महिनाभर अगोदरच बुकींग!

Avatar- The Way of Water Advance Booking - जेम्स कॅमेरुनचं नाव तर ऐकलं असेल...हाच तोच दिग्दर्शक ज्यानं पहिल्यांदा टायटॅनिकच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. दहा वर्षांहून अधिक काळ त्यानं या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिला होता. जगभरात टायटॅनिकनं केलेली कमाल अनेकांना ठाऊकच आहे. पाचपेक्षा अधिक ऑस्कर आपल्या नावावर करुन या चित्रपटानं मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता.

आता याच जेम्स कॅमेरुननचा अवतार २ हा पुढील महिन्यात प्रदर्शित होतो. अवतारच्या पहिल्या भागाला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं आतापर्यतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून वेगळा विक्रम रचला होता. कॅमेरुन यांच्या अवतारच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा कॅमेरुन यांचे नाव चर्चेत आले. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा चित्रपट अजुन प्रदर्शित व्हायला महिन्याङभराचा कालावधी आहे. मात्र त्यापूर्वीच त्याचं अॅडव्हान्स बुकींग सुरु झालं आहे.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

सोशल मीडियावर अवतार द वे ऑफ वॉटरचा ट्रेंड सुरु आहे. त्याला नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांनी, कॅमेरुन यांच्या चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव करत कधी हा चित्रपट प्रदर्शित होतो आणि आपण तो थिएटरमध्ये पाहतो याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. पहिल्या पार्टनंतर कित्येक दिवसांपासून प्रेक्षक दुसऱ्या पार्टची वाट पाहत होते.

कॅमेरुननं आपल्या या चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्याच जगाचे चित्र अधोरेखित केले आहे. त्यातील ग्राफीक्स, साउंड, सिनेमॅटोग्राफी, संगीत हे सारंच कमालीचं प्रभावी आहे. त्याला तोड नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहते तर अवतार द वे ऑफ वॉटरच्या प्रेमात पडले आहेत. त्याचा ट्रेलर पाहून त्यांना आता चित्रपट प्रदर्शित होण्याचे वेध लागले आहेत. भारतात हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजुन एक महिन्याचा कालावधी आहे.

हेही वाचा: Neha Sharma: गुलाबी थंडीत नेहाचे उबदार फोटो

त्यापूर्वी अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली आहे. मेकर्सनं याविषयीची अधिक माहिती दिली आहे. जागतिक चित्रपट विश्वातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध चित्रपट म्हणून अवतारचे नाव घेतले जाते. आता त्याच्या दुसऱ्या पार्टचे प्रदर्शन अजुन महिनाभरानं होणार आहे. दहा वर्षांपूर्वी पहिला त्याचा पहिला पार्ट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर एवढ्या मोठ्या कालावधीनंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

हेही वाचा: Bollywood News: 'करिश्मा-अभिषेकचं लग्न शक्यच नव्हतं', काय होतं कारण?