आयुषमान खुराना आणि वाणी कपूर प्रथमच स्क्रीन शेअर करणार; नव्या चित्रपटाची झाली घोषणा

संतोष भिंगार्डे
Friday, 7 August 2020

एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक कपूरच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. अद्याप नाव न ठरलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे.

मुंबई : रॉक ऑन, काय पो छे, केदारनाथ अशा यशस्वी सिनेमांमुळे एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक कपूरच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. अद्याप नाव न ठरलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक पुरोगामी प्रेमकथा आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सध्याचा लोकप्रिय अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री वाणी कपूर प्रथमच एकत्र काम करणार आहे. 

रुग्णालयाने बिलासाठी डिस्चार्ज नाकारला; नगरसेवकाने पीपीई कीट घातली आणि रुग्णाला चक्क उचलून बाहेर आणले

अभिषेक कपूर म्हणाला, "मला वाटतं बेफिक्रेमध्ये वाणीने अप्रतिम काम केलंय. ती सुंदर आहे आणि उत्तम कलाकार आहे. आयुषमान आणि ती असे एकत्र सेटवर पाहण्यास मी उत्सुक आहे. त्यांची जोडी जबरदस्त असेल, असा मला विश्वास आहे." वाणी म्हणाली, "ही फारच छान व मनाला स्पर्श करणारी कथा आहे. अभिषेक कपूरचे सिनेमे प्रेरणादायी वाटतात. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होतीच. त्याच्या दृष्टिकोनाचा, विचारांचा भाग होण्याची ही अप्रतिम संधी आहे. आयुषमान हा आमच्या पिढीतील एक सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे आणि आमचा पहिला सिनेमा अशी छान प्रेमकथा आहे, हे मला फार छान वाटतंय."

खासगी रुग्णालयाच्या अवाजवी शुल्क आकारणीला बसणार चाप; राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

'आयुषमान खुराना शैली' असा एक नवा प्रकारच हिंदी सिनेमात जन्माला घालणारे अनेक सिनेमे आयुषमानने केले आहेत. तो याआधीही म्हणाला आहे की, " सिनेमासाठी मला जे शारीरिक बदल करायचे आहेत त्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. मी एका संपूर्णपणे नव्या लुकमध्ये दिसणार आहे. मी पडद्यावर याआधी असा कधीच दिसलो नव्हतो आणि प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असेल, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी काहीशी दमछाक करणारी, आतून हलवून काढणारी आहे. पण मला वाटतं ही वेदना बरंच काही देऊन जाईल."
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushamann khuranna and wani kapoor will share screen together first time