आयुष्यमान खुराना : सलग सात सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूडचा 'रायझिंग सुपरस्टार'

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

'बाला' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्सऑफिसवर त्याने बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणेज आयुष्मानचा हा चक्क सातवा सलग सुपरहिट होणारा चित्रपट आहे. जाणून घ्या कोमकोणते सिनेमे या हिटलिस्ट मध्ये आहेत. 

मुंबई : आय़ुष्मान खुराना हे नाव सध्या बॉलिुवूडमध्ये अगदी टॉपवर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आयुष्मानने त्याच्या अभिनयाच्या खास शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेता आयुषमान खुराना प्रसिद्ध आहे तो त्याच्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी. आजपर्यंत त्याने अनेक भूमिका साकारल्या आणि प्रत्येक रोलला पूर्णपणे न्याय दिला आहे. रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा प्रवास सोपा नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्याने वेगळा ठसा उमटवला. त्याचा 'बाला' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्सऑफिसवर त्याने बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणेज आयुष्मानचा हा चक्क सातवा सलग सुपरहिट होणारा चित्रपट आहे. जाणून घ्या कोमकोणते सिनेमे या हिटलिस्ट मध्ये आहेत. 

आयुष्मानचा जन्म 14 सप्टेंबर 1984 ला चंदीगढमध्ये झाला. कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करून त्याने ताहिरा या त्याच्या गर्लफ्रेंटशी लग्न केलं. ताहिरा आणि आयुष्मानच्या लग्नाला जवळपास 11 वर्षे झाली आहेत. आणि त्याला आता दोन गोंडस मुलंही आहेत. आयुष्मानला 'विकी डोनर' य़ा चित्रपटासह पहिला ब्रेक मिळाला. दिग्दर्शक शुजीत सरकार यांनी त्याला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. चित्रपटाआधी त्याने MTV चॅनलवरील प्रसिद्ध शो 'रोडिज' मध्ये सहभाग घेतला होता. या चित्रपटानंतर आयुष्मानने मागे वळून नाही पाहिले. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या आयुष्मानने उत्तम अभिनयाने आणि हटके सिनेमांसह आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

Image may contain: 1 person, text

1 शुभ मंगल सावधान (2017)
अरेंज मॅरेजचा एकुणच प्रवास आणि कशाप्रकारे ते आखिर यशस्वी होतं याची कथा घेऊन वास्वव दाखवणारा चित्रपट म्हणजे 'दम लगाके हैश्या'. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयुष्मान आणि भूमीने उत्तम अभिनयासाह या चित्रपटाला सुपरहिट केलं. त्यानंतर या जोडीने 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट केला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरपूर पसंती दिली. शिवाय भूमी आणि आयुष्मान या जोडीलादेखील प्रचंड पसंत केलं गेलं. या सिनेमाने 2.71 कोटींची कमाई करत बॉक्सऑफिसच्या सुपरहिट सिनेमांमध्ये स्थान मिळवलं. हा आयुष्मानचा दुसरा चित्रपट आहे जो सुपरहिट ठरला. 

Image may contain: 3 people, people smiling

2 बरेली की बर्फी (2017)
बरेली कि बर्फी हा चित्रपट प्रचंड कॉमेडी आहे. तरीदेखील सामाजिक विषयांना हात घालत वास्वत दाखविण्याचा प्रयत्न य़ा चित्रपटाने केला. अभिनेत्री क्रिती सॅनन आणि राजकुमार राव यांच्यासोबत मुख्य भूमिकेत आयुष्मान दिसला. या तिन्ही कलाकारांनी चित्रपटाला न्याय देत भरपूर प्रेम मिळवलं. बरेली की बर्फीने बॉक्सऑफिसवर 2.42 कोटींचा आकडा गाठत चांगलीच कमाई केली. हा आयुषअमानचा तिसरा सुपरहिट सिनेमा ठरला. शिवाय गंभीर आणि ड्रामा अशाप्रकारच्या भूमिकेच्या पलिकडे आय़ुष्मानचा हा हिट कॉमेडी सिनेमा ठरला. 

Image may contain: 1 person, text

3.अंधाधून (2018)
अंधाधून हा चित्रपट आयुष्मानच्या आजवरच्या प्रवासातील एक खास चित्रपट ठरला कारण, या सिनेमासाठी त्य़ाला राष्ट्रीय़ पुरस्कार मिळाला. अभिनेत्री तब्बू आणि राधिका आपटेसह त्याने उत्तम अभिनयाचं एक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं. 'अंधाधूनने मला भरपूर काही दिलं आणि शिकवलं. हा चित्रपट माझ्य़ा आयुष्यातला खास अनुभव आहे', असं मत आयुष्मानने व्यक्त केलं. बॉलिवूडमधूनही आयुष्मानच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली.  प्रेक्षकांनी य़ा चित्रपटाला प्रचंड पसंती दिली आणि 2.70 कोटींचा गल्ला बॉकिसऑफिसवर मिळवला. त्याचसोबत आयुष्मानचा हा सलग चौथा हिट सिनेमा ठरला. 

Image may contain: 6 people, people smiling, text

4.बधाई हो (2018)
आपल्याच समाजातून निघालेल्या विषयाला कॉमेडीच्या जबरदस्त तडक्यासह 'बधाई हो' या चित्रपटातून मांडलं गेलं आहे. एकाच महिन्यात आयुष्मानचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले विशेष म्हणजे अंधाधूनच्या यशानंतर  दुसरा चित्रपट 'बधाई हो' याने बॉक्स ऑफिसवर तितकाच धुमाकूळ घातला. 
ज्या वयात नातवंडाना खेळवायचं त्याच वयात नकुल (आयुषमान खुराना) ची आई गर्भवती राहते. ही गोष्ट लपवताना नुकलची जी नाचक्की होते ती बधाई हो मधून पाहायला मिळतो. आतापर्यंत या विषयावर चित्रपट न आल्यानं प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद चित्रपटाला मिळला. याचसोबत चित्रपटाने 7.35 कोटींची कमाई केली आणि बॉक्सऑफिसवर सुपरहिटचा टॅग मिळवला. पाचव्या सुपरहिट सिनेमासह आयुषमानच्या अभिनयाचा दर्जा वाढतच होता. बॉलिवूडमध्येही त्याच्या नावाचाच बोलबाला होता. 

Image may contain: 1 person, text

5. आर्टीकल 15 (2019)
लोकशाही असलेल्या आणि जातीभेदमुक्त, घटनेने अधिकार आणि स्वातंत्र्य असलेल्या देशात आपण राहतो. दुसरीकडे अत्याधुनिक सोयीसुविधा-विचारशैली असलेल्या सुसंस्कृत समाजात आपण वावरतो आहोत, हा भ्रम कधीही तुटून पडेल अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे कदाचित शक्य असते मात्र त्याचे परिणाम नाकारता य़ेत नाहीत. त्यातही अशी घटना अधिकारी म्हणून हाताळायची वेळ आलीच तर न्याय-अन्याय, सत्य-असत्य त्याच्याविरूध्द असलेली  वास्तविक परिस्थिती या सगळ्यात तो पुरता भरडला जातो.
भरडून निघतो. उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणावरुन प्रेरित असलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटात दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जातिव्यवस्थेचे खरे वास्तव समोर ठेवत रोखठोक भाष्य केले आहे. या गंभीर आणि तरीही देशाचं भिषण वास्तव समोर आणणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली. सिनेमाने 5.20 कोटींचा आकडा पार केला आणि त्याचसोबत यावर्षीचा आयुष्मानचा पहिला आणि त्याच्या सुपरहिट सिनेमा ठरला. 
Image may contain: 1 person

6. ड्रिम गर्ल (2019)
या चित्रपटात आयुष्मान (लोकेश बिश्त) एका मुलाची भूमिका साकारताना दिसतो. तो नाटकांमध्ये महिलांच्या भूमिकादेखील साकारत असतो. मात्र त्याच्या वडिलांनी त्याने अशा भूमिका करणे आवडत नसते. त्यामुळे तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात असतो. 
काही दिवसातच लोकेशला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळते. त्यानंतर तो अनेक कस्टमरशी मुलींच्या आवाजात गप्पा मारू लागतो. त्यावेळी तो अनेकांना माझं नाव पूजा असल्याचं सांगतो. पोलिस ऑफिसरपासून ते गुंडांपर्यंत अनेकांवर पूजाच्या या आवाजाची भूरळ पडते. त्यामुळे पुढे अनेक गोष्टींचा सामना लोकेशला करावा लागतो. असा हा कॉमेडीची मेजवानी असणारा चित्रपट प्रेक्षकांना भावला आणि त्याने 10.05 कोटींचा आकडा गाठला. 2019 या वर्षातील आयुष्मानचा दुसरा सुपरहिट सिनेमा. पुन्हा एकदा अनोखी भूमिका साकारत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. 'ड्रिम गर्ल' आयुष्मानचा सलग सहावा हिट चित्रपट ठरला.  

Image may contain: 1 person, standing and stripes

7. बाला (2019)
मनोरंजक चित्रपटांमुळे सुपरस्टार्सना टक्कर देणा-या आयुषमानचा 'बाला' चित्रपट 8 नोव्हेंवर रोजी प्रदर्शित झाला. अमर कौशिक यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात आयुषमानचे नाव बाला आहे. त्याला ऐन पंचविशीत केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. याच बालाची व्यथा या चित्रपटात मांडली आहे.'बाला' ने प्रदर्शनाच्या दिवशी १०.१५ कोटी तर दुसऱ्या दिवशी १५.७३ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आयुषमानसोबत भूमी पेडणेकर आणि यमी गौतम या दोघी अभिनेत्रींनी काम केले आहे. यात केसगळती एखाद्या तरुणासाठी किती त्रासदायक ठरु शकते आणि आपले टक्कल लपवण्यासाठी एक तरुण किती काय करतो या सगळ्याची गंमत दाखवली आहे.

आयुष्मानचा याचवर्षीचा तिसरा आणि सगल सुपरहिट सिनेमा देणारा सातवा चित्रपट ठरला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayushman Khurana the raising star of Bollywood who gave seven super hit movies in a row