आयुषमानने सांगितला त्याच्या फिटनेसचा फंडा; वाचा काय आहे तर...  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 जुलै 2020

आजचे संकट पाहता सगळ्यांनी आपापली तंदुरुस्ती राखणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला स्वतःच्या फिटनेसचा मार्ग शोधणे आवश्यक आहे. कारण ते फार महत्वाचे आहे.

मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना सध्या चंदीगडमध्ये आहे. तिथे कोरोनाच्या या काळात तंदुरुस्त राहण्याबाबत जागरूकता करताना दिसत आहे. तंदुरुस्त राहण्यासठी सायकल चालविणे महत्त्वाचे आहे आणि तो निरोगी राहण्याचे महत्त्व दाखवण्यासाठी सायकल चालवीत होता.

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...

याबद्दल बोलताना आयुषमान म्हणाला, 'आजचे संकट पाहता सगळ्यांनी आपापली तंदुरुस्ती राखणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला स्वतःच्या फिटनेसचा मार्ग शोधणे आवश्यक आहे. कारण ते फार महत्वाचे आहे.  मी चंदीगडमध्ये असल्याने माझ्या कुटुंबासह आणि पालकांसह वेळ घालवत आहे. मी सायकल चालविण्याचे ठरविले आहे.''

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

सायकलिंग हा त्याच्यासाठी खूप चांगला अनुभव असल्याचे सांगत तो पुढे म्हणाला, ''मला लहानपणापासून सायकल चालवण्याची प्रचंड आवड होती. पण माझ्या कामाच्या वेळातून त्यासाठी वेळ नाही. सायकलिंग मला फक्त फिट रहायला मदत करते असं नाही तर मला माझ्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दल विचार करायला जो एकांत लागतो तेही देतं. एकट्याने सायकल चालवणे हा माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ध्यानाचा अनुभव आहे - मी एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो.

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

पुन्हा कामावर जाण्यासाठी उत्सुक असलेल्या आयुषमानने हेही सांगितले की, 'मी शूटिंग सुरू होण्याची खूप आतुरतेने वाट बघतोय आणि सेटवर असण्यालाही मी तितकंच मिस करतोय.  मी अनेक गोष्टींचे शूटिंग करण्यासाठी रेडी आहे. प्रॉडक्शन टीमकडून सुरक्षेची कामे पूर्ण होताच मी सेटवर परत येईन.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushman khurana said about his fitness secret