आयुषमान व भूमीची केमिस्ट्री पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

"दम लगा के हईशा' चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हे दोघे "शुभ मंगल सावधान' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रोमॅंटिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमीळ कॉमेडी फिल्म कल्याण समयाल साधमचा रिमेक आहे. याचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना आणि निर्मिती आनंद एल. राय व इरोज करणार आहेत. ही माहिती आयुषमानने ट्‌विटरवर दिली. त्याने ट्‌विट केलंय की, "आगामी चित्रपटाबाबत सांगताना मी खूप उत्साहित आहे. "शुभ मंगल सावधान' चित्रपटात प्रेमळ भूमीही आहे. आनंद एल.

"दम लगा के हईशा' चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हे दोघे "शुभ मंगल सावधान' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रोमॅंटिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमीळ कॉमेडी फिल्म कल्याण समयाल साधमचा रिमेक आहे. याचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना आणि निर्मिती आनंद एल. राय व इरोज करणार आहेत. ही माहिती आयुषमानने ट्‌विटरवर दिली. त्याने ट्‌विट केलंय की, "आगामी चित्रपटाबाबत सांगताना मी खूप उत्साहित आहे. "शुभ मंगल सावधान' चित्रपटात प्रेमळ भूमीही आहे. आनंद एल. राय यांचा मी आभारी आहे.'  
 

Web Title: Ayushmann Khurrana and Bhumi Pednekar pair up again for 'Manmarziyan'