
Ayushmann Khurrana: बॉलीवुड स्टार आयुष्मान खुराना नागराज मंजुळेच्या प्रेमात, म्हणाला, त्याचे चित्रपट..
Ayushmann Khurrana on nagraj manjule : वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि दमदार अभिनय यामुळे कायमच बॉलीवुडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना. नव्या पिढीच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.
विकी डोनरपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आजही जोरदार सुरू आहे. आज बोलीवूडमध्ये अनेक कलाकार आहेत पण प्रेक्षकांना तो आपला वाटतो. त्याचा सहजसुंदर अभिनय, त्याच्याकडे असलेलं गायनाचं कौशल्य, त्याचं दिसणं हे सारं काही प्रेक्षकांना कमालीचं भावतं.
पण आयुषमानला मात्र एक मराठी दिग्दर्शक भावला आहे. आयुष्यमानने नुकत्याच एका मुलाखतीत सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे विषयी महत्वाचं विधान केलं.
(ayushmann khurrana said i likes nagraj manjule film movies)
आयुष्यमान खुराना याने 'एबीपी माझा'च्या 'महाकट्टा' या कार्यक्रमात बॉलीवुड, त्याचं करियर, मनोरंजन विश्व याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 'सध्याचा काळ हा कलाकार होणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. तुम्ही कोणत्याही शहरातून, गावातून या.. अगदी तुमचं या क्षेत्रात कोणीही नसेल तरी तुम्ही इथे करिअर करु शकता. कारण तुमच्यात टॅलेंट असेल तर ते टॅलेंट लपून राहात नाही. तुम्हाला संधी नक्कीच मिळेल.'असं तो म्हणाला.
यावेळी त्याला मराठी चित्रपटांबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, 'मी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. नागराज मंजुळेचे चित्रपट मला विशेष आवडतात. हे चित्रपट मातीशी जोडलेले असतात ते आपल्या समाजावर भाष्य करत असतात. नागराज यांचे चित्रपट असेच असल्याने मला ते आवडतात. मला मराठी सगळं समजतं पण बोलता येत नाही.'असं तो या मुलाखतीत म्हणाला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या मुलाखतीत याने आपल्या स्ट्रगल विषयी ही सांगितले. तो म्हणाला, 'मला लहानपणा पासूनच अभिनेता व्हायच होतं. पण तेव्हा तसं वातावरण घरात नव्हतं. मग मी कॉलेज मध्ये असताना नाटकातून सुरुवात केली. मी 'आयएपीएल' देखील होस्ट केलं आहे, मी क्रिकेटपण खेळलो आहे, हे खूप कमी लोकांना माहित असेल.''
''काही काळानंतर मुंबईमध्ये मी स्थिरवलो. मी पत्रकार म्हणून अनेकांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी एकच विचार केला की, माझा पहिला चित्रपट चांगला असायला हवा. मी 'विकी डोनर'च्या आधी सहा चित्रपटांना नकार दिला होता.' असं आयुष्यमान यावेळी म्हणाला.