esakal | 'मस्त डॉक्टर रे बाबा' फॅमिली मॅनच्या शारिबनं केलं आयुषमानचं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

'मस्त डॉक्टर रे बाबा', फॅमिली मॅनच्या शारिबनं केलं आयुषमानचं कौतुक

'मस्त डॉक्टर रे बाबा', फॅमिली मॅनच्या शारिबनं केलं आयुषमानचं कौतुक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

डॉक्टर जी (doctor ji) नावाच्या चित्रपटातून तो आपल्या समोर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. त्यात आयुषमान खुराणा पहिल्यांदाच एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आयुषमान हा सध्याच्या घड़ीला बॉलीवूडमध्ये सर्वात प्रभावी अभिनेता आहे. त्यानं गुलाबो सिताबोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्याबरोबरही काम केले आहे.

आयुषमानच्या बधाई हो या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आपल्या एका नव्या भूमिकेसाठी आयुषमान तयार आहे. द फॅमिली मॅनच्या शारिब हाश्मीनं त्याच्या फोटोवर एक कमेंट केली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, मस्त रे डॉक्टर बाबा. आयुषमाननं आपल्या पोस्टविषयी लिहिलं आहे, डॉक्टर हा विषय माझ्या अतिशय जवळचा आहे. मी स्वत; या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे. अजून आम्ही त्या चित्रपटाचे शुटिंग सुरु केलेलं नाही. मात्र एक वेगळ्या विषयावरील चित्रपट करताना आनंद होतो आहे. हे सांगायला मला हवे. या शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

हेही वाचा: अखेर 'देवमाणूस' घेणार प्रेक्षकांचा निरोप

या चित्रपटामध्ये आयुषमान डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात शेफाली शहाची भूमिका आहे. अनुभूती कश्यप यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कॉमेडी प्रकारातील या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाची कथा सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ यांनी लिहिली आहे.

loading image