'आज हम जीवीत है पर मरे हुए है' म्हणत आयुष्मानने केली कविता सादर..तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

अभिनेता-गायक आयुष्मान खुरानाने सध्याच्या ही परिस्थीती पाहता एक कविता लिहिली आहे..त्याची ही कविता इतकी भावूक आहे की ती ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल..

मुंबई- संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलंय..या संकटापासून बचाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे..मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होताना दिसून येतोय..मानसिकरित्या अनेकजणांची परिस्थिती बिघडत चालली आहे..मात्र या संकटकाळात सरकारसोबत अनेक सिनेस्टार आपापल्या परिने मदत करताना दिसत आहेत..अनेक सेलिब्रिटी लोकांना या तणावातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत..तर काहीजण त्यांना प्रोत्साहन देत आहेत..यासाठीच अभिनेता-गायक आयुष्मान खुरानाने सध्याच्या ही परिस्थीती पाहता एक कविता लिहिली आहे..त्याची ही कविता इतकी भावूक आहे की ती ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल..

हे ही वाचा: वरुण धवन लॉकडाऊननंतर 'हे' करणार पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आयुष्मान उत्तम अभिनेता असण्योसोबतंच एक उत्तम गायकही आहे..आयुष्मान अनेकदा त्याच्या सोशल मिडीयावरुन शायरी आणि कविता पोस्ट करत असतो...मात्र आता जी कविता त्याने लिहिली आहे त्यातून तो उत्तम लेखक असल्याचाही पुरावा आहे..हा पाहा त्याचा भावूक करणारा व्हिडिओहा व्हिडिओ पाहून लोक त्याची स्तुती करत आहेत..या व्हिडिओमध्ये त्याने कविता प्रेक्षकांना ऐकवण्यासाठी सादर करत शेअर केली आहे. सोबतंच त्याने ही कविता त्याच्या पोस्टमध्ये देखील लिहीली आहे जेणेकरुन त्याचे चाहते त्याची ही कविता हवं तेव्हा वाचू शकतील..

केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर हृतिक रोशन, क्रिती सॅनन सारख्या अनेक सेलिब्रिटींनाही ही कविता आवडली आहे..

Ayushmann Khurrana's special poem for COVID-19 warriors is winning ...

हा व्हिडिओ आत्तापर्यंत २१ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे..आयुष्मानच्या या कवितेचं नाव आहे 'हमको को तो सिर्फ घर पर रहना है'. सद्यपरिस्थितीवर आधारित आयुष्मानची ही कविता सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होतेय...

ayushmann khurrana wrote an emotional poem on coronavirus  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushmann khurrana wrote an emotional poem on coronavirus