आयुष्यमानचा 'ड्रीम गर्ल' अवतार तुम्ही पाहिलात का?

Dream Girl.jpg
Dream Girl.jpg

आपल्या अभिनयासोबतच अनोख्या चित्रपट निवडीसाठी ओळखला जाणारा आणि यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा अभिनेता आयुष्यमान खुराना आपला नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयुष्मानच्या आगामी 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाचा ट्रेलर आज (सोमवार) रिलीज करण्यात आला. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये आयुष्यमानने साडी नेसली असून त्याचा हा नवा अवतार प्रेक्षकांनाही आवडला आहे. हा चित्रपट येत्या 13 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटात आयुष्मान (लोकेश बिश्त) एक अशा मुलाची भूमिका साकारताना दिसत आहे. तो नाटकांमध्ये महिलांच्या भूमिकादेखील साकारत असतो. मात्र त्याच्या वडिलांनी त्याने अशा भूमिका करणे आवडत नसते. त्यामुळे तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात असतो. 

काही दिवसातच लोकेशला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळते. त्यानंतर तो अनेक कस्टमरशी मुलींच्या आवाजात गप्पा मारू लागतो. त्यावेळी तो अनेकांना माझं नाव पूजा असल्याचं सांगतो. पोलिस ऑफिसरपासून ते गुंडांपर्यंत अनेकांवर पूजाच्या या आवाजाची भूरळ पडते. त्यामुळे पुढे अनेक गोष्टींचा सामना लोकेशला करावा लागतो. अशी साधारण कथा या ट्रेलरमधून समजते. मात्र, या साध्या कथेला असणारी विनोदाची जोड प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

'सोनू के टिटू की स्वीटी' फेम अभिनेत्री नुसरत भरुचा या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसत आहे. राजा शांडिल्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून एकता कपूर आणि शोभा कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आयुष्मान खुरानाला एका नवीन अवतारात बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. त्यामुळे या चित्रपटाची ओढ आता प्रेक्षकांना लागली आहे, अस म्हणायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com