‘दिल दोस्ती…’ नंतर पुष्कराज चिरपुटकरसुद्धा दिसणार ‘बापजन्म’मध्ये

baapjanma new teaser esakal news
baapjanma new teaser esakal news

मुंबई : युवा आणि प्रतिभावान निपुण धर्माधिकारी ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करतो आहे, हे जाहीर झाले तेव्हा त्याच्या चित्रपटात कोणकोण काम करत आहे, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटाचे जे टीजर प्रसारित झाले त्यांमध्येही या चित्रपटात काम करणाऱ्या कोणत्याही कलाकाराचे नाव घोषित करण्यात आले नव्हते. पण काही दिवसांपूर्वी चित्रपटातील प्रमुख चेहरा म्हणून सचिन खेडेकर यांचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता तर या चित्रपटाशी संबंधित आणखी एका गोष्टीचा उलगडा नुकताच करण्यात आला आहे.

‘बापजन्म’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि सचिन खेडेकर यांच्यासह आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील आशू आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ मधील पप्या या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच भारतीय डिजिटल पार्टीच्या ‘आपल्या बापाचा रस्ता’ या वेबसीरीजमध्येही तो झळकला होता. ‘बुधिया सिंग बॉर्न टू रन’ या हिंदी चित्रपटात आणि ‘टीटीएमएम’ या मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

बहुआयामी आणि ज्यांना या क्षेत्रात सर्वाधिक मान दिला जातो ते सचिन खेडेकर ‘बापजन्म’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. आणि त्यांच्याबरोबर आपला सर्वांचा लाडका अभिनेता पुष्कराज चिरपुटकर हा सुद्धा प्रमुख भूमिकेत असेल”. असे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले. या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर’ने केली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रदर्शित होत आहे.”

‘बापजन्म’मध्ये सचिन खेडेकर आणि निपुण धर्माधिकारी हे दोन प्रख्यात कलाकार एकत्र आले आहेत. त्याचमुळे या क्षेत्रातील मंडळी आणि अगदी प्रेक्षक या दोघांचीही उत्कंठा अगदी ताणली गेली आहे आणि ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. सचिन खेडेकर यांच्या नावावर २००हूनही अधिक चित्रपट, अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि कित्येक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. निपुण धर्माधिकारी हा असा मराठी कलाकार आहे कि ज्याच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला. त्याचबरोबर २०१६ मध्ये ‘फोर्ब्स एशियाज 30 अंडर 30’ म्हणून गौरव झाला.

‘बापजन्म’चे संपूर्ण लेखन निपुण धर्माधिकारीने केले आहे. त्याने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘अमर फोटो स्टुडीओ’ हे त्याचे अलीकडील नाटक रंगभूमीवर उत्तमरीत्या सुरु आहे. त्याने भारतीय डीजीटल पार्टीसाठी सादर केलेल्या कास्टिंग काऊच वुईथ अमेय अँड निपुण या वेबशोच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला.

‘बापजन्म’चे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आतापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com