Video : हळुवार नात्यांचा 'बाबा' येतोय 2 ऑगस्टला!

टीम ईसकाळ
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे : 'भावनेला भाषा नसते' असा संदेश देणारा 'बाबा' चित्रपट येत्या 2 ऑगस्टला रिलीज होतोय. अभिनेते दिपक दोब्रियाल आणि अभिनेत्री नंदिता धुरी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासह अभिजीत खांडकेकर आणि स्पृहा जोशी हे ही प्रमुख भूमिकेत दिसतील. आर्यन मेंघजी हा बालकलाकार शंकरच्या भूमिकेत दिसेल व त्याच्याच भोवती ही कथा फिरते...  

मूक आई वडिलांसोबत राहणारा शंकर ही मुकाच राहतो, पुढे या तिघांच्या आयुष्यात वादळं येतात, त्याला हे कुटूंब कसं तोंड देतं यावर बेतलेला हा चित्रपट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते दिपक दोब्रियाल पहिल्यांदाच या मराठी चित्रपटात काम करत आहेत. संजय दत्त प्रॉडक्शन्सची आणि 'ब्ल्यू मस्टँग'चे अशोक व आरती सुभेदार हे चित्रपटाचे निर्मिती आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Marathi movie release on 2 August