बादशाहोचे दीवार कनेक्‍शन 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

गेल्या अनेक चित्रपटांमधून जुन्या चित्रपटातील गाण्यांचा नवीन बाज आपण पाहिला. मग ते "ओके जानू'मधील "हम्मा हम्मा' गाणे असो वा "काबिल'मधील "सारा जमाना' असो. गेल्या चार-पाच वर्षांपासून हा ट्रेंड ऑन आहे. जुनी गाणी नवीन रूपात तरुणांना ऐकायला आवडत असल्याने चित्रपट निर्मातेही अशी गाणी आपल्या चित्रपटात आवर्जून वापरत आहेत.

"बादशाहो' हा चित्रपट आणीबाणीचा काळ दाखविणारा आणि 70च्या दशकातील घटनांवर आधारित आहे. त्यामुळे त्या वेळी आलेल्या "दीवार' या चित्रपटातील गाणे या चित्रपटात कुठेही ऑड वाटणार नाही, असे कदाचित चित्रपट निर्मात्यांना वाटले असावे. म्हणूनच की काय "बादशाहो' या चित्रपटात अमिताभ यांच्या दीवार चित्रपटातील "कह दूं तुम्हे' हे गाणं नवीन रूपात समाविष्ट करण्यात आलेय.

या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, या गाण्यावर इम्रान हाश्‍मी आणि इशा गुप्ता थिरकणार आहेत. "बादशाहो' चित्रपटात इम्रान हाश्‍मी आणि इशा गुप्ता यांच्याबरोबरच अजय देवगण, इलियाना डिक्रुज आणि विद्युत जामवालही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मीलन लुथरिया दिग्दर्शित "बादशाहो' चित्रपट 1 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Badshaho diwar connection