Bageshwar Maharaj Biopic : कोण करणार बागेश्वर महाराजांची भूमिका? बायोपिकची घोषणा

मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावातील बागेश्वर महाराजांनी सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Bageshwar Dham Baba Biopic Director Abhay Pratap Singh
Bageshwar Dham Baba Biopic Director Abhay Pratap Singhesakal

Bageshwar Dham Baba Biopic Director Abhay Pratap Singh : बागेश्वर महाराजांचे नाव आता केवळ भारतातच नाहीतर जगात ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा सुरु आहे ते बागेश्वर धाम महाराज मोठे सेलिब्रेटी झाले आहे. भक्तांच्या मनात काय चालले आहे हे ओळखून त्यांना मार्गदर्शन करण्यात बाबा गेल्या कित्येक दिवसांपासून व्यस्त आहेत. सध्या ते पुन्हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावातील बागेश्वर महाराजांनी सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगवेगळे चमत्कार करत बाबांनी भक्तांना अवाक् केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक संस्थांनी टीका केली आहे. भक्तांच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात बागेश्वर महाराजांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. बागेश्वर महाराजांच्या अंगी दैवी शक्ती असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

फिल्ममेकर अभय प्रताप सिंह यांनी बागेश्वर महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा केली आहे. ते लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावं बागेश्वर महाराजांची भूमिकेसाठी चर्चेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी ओटीटीवर प्रकाश झा यांच्या आश्रम मालिकेमध्ये बॉबी देओलनं साकारलेली बाबाजींची भूमिका प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय होती.

बॉबी देओलच्या बाबाजी जाने मन की बात या संवादाची बराचकाळ चर्चाही होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागेश्वर महाराज यांच्या आयुष्यावर ज्या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे त्यामध्ये छतरपूर - खजुराहो रस्त्यावर असलेल्या गढा गावातील वेगवेगळ्या गोष्टींना मोठ्या पडद्यावर साकारले जाणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन अभय सिंह करणार आहेत.

Bageshwar Dham Baba Biopic Director Abhay Pratap Singh
Shah Rukh Khan: कोण आहे हा 'छोटा पठाण' ज्याचं शाहरुखने केलं कौतुक, पाहा व्हिडिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com