Happy Birthday Anushka : देवसेनेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

टीम ईसकाळ
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

तमिळ व तेलुगू भाषांमध्ये अनुष्काने सुरवात केली, तिथे ती स्टार झाली मग तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक तरूणांची दिल की धडकन असलेली अनुष्का आता कारकिर्दीत वरच्या स्थानावर आहे. 

बाहुबलीत देवसेना म्हणून चाहत्यांच्या मनावर जादू करणारी अनुष्का शेट्टी हिचा आज 37वा वाढदिवस! तिने दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तमिळ व तेलुगू भाषांमध्ये अनुष्काने सुरवात केली, तिथे ती स्टार झाली मग तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक तरूणांची दिल की धडकन असलेली अनुष्का आता कारकिर्दीत वरच्या स्थानावर आहे. 

तुम्हाला अनुष्काबद्दल काही हटके गोष्टी माहिती आहेत का? 
अनुष्का चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ती एक यशस्वी योग प्रशिक्षक होती. त्यानंतर तिने अभिनयाची वाट धरली आणि त्यात उत्तम कारकिर्द करून दाखवली. तिचं खरं नाव अनुष्का नसून स्वीटी शेट्टी होते. अभिनय क्षेत्रात आल्यावर तिने आपले स्वीटी नाव बदलून अनुष्का ठेवले. अनुष्का दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये इतकी फेमस आहे की, अनेक दिग्दर्शक तिच्याशिवाय चित्रपच करत नाहीत. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही तिचे नाव आहे.

Image result for anushka shetty

गाजलेल्या भूमिका
2005मध्ये तिने सुपर या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. राजमौली दिग्दर्शित बाहुबलीमधील तिच्या देवसेनेच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली आणि तितकीच लोकप्रिय झाली. तसेच तिच्या वैष्णवी या दाक्षिणात्य चित्रपटातही तिने उत्तम व्यक्तिरेखा वठवली आहे. अरूंधती व भागामती या चित्रपटांमुळे ती नावारूपास आली तर दाक्षिणात्य सिंघमने तिला ग्लॅमरस बनवलं. 

Image result for anushka shetty

नुकताच तिच्या 'निःशब्दम्' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. यात ती आर. माधवन सोबत संगीतकाराच्या भूमिकेत दिसतील. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahubali actress Devsena Anushka Shettty birthday wishes