'बाहुबली' फेम अभिनेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मधू सध्या तमिळ सीरियलमध्ये अभिनय करत आहे. मात्र, मधूचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय आल्याने भारतीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 

‘बाहुबली’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारा अभिनेता मधू प्रकाश याची पत्नी भारतीने मंगळवारी (ता.6) आत्महत्या केली. मधू आणि भारती हे दांपत्य हैद्राबाद येथील रहिवासी असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

बाहुबली या चित्रपटात मधुने एका सैनिकाची भूमिका साकारली होती. 2015 मध्ये मधू आणि भारती यांचा विवाह झाला होता. भारती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तर मधू सध्या तमिळ सीरियलमध्ये अभिनय करत आहे. मात्र, मधूचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय आल्याने भारतीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 

Image may contain: 3 people, beard

मधूने सांगितले की, मंगळवारी सकाळी मी जिमला जात असल्याचं पत्नीला सांगितलं. तसेच तिथूनच शूटिंगसाठी बाहेर जाणार असल्याचेही सांगितलं होतं. त्या दरम्यान भारतीचा फोन आला. भारतीने मला घरी येण्यास सांगितलं होतं आणि जर मी घरी गेलो नाही तर आत्महत्या करण्याची धमकी पण दिली होती. त्यावरून आमच्यात जोरदार भांडण झाले. जेव्हा मी घरी आलो होतो, तेव्हा भारतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

सदर घटनेची माहिती मधूने पोलिसांना दिल्यानंतर भारतीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahubali Fame actors wife commits suicide