बजरंगी भाईजानच्या मुन्नीला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार |Bajrangi Bhaijan Munni fame harshali Malhotra dr. babasaheb ambedkar award social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munni fame harshali malhotra
बजरंगी भाईजानच्या मुन्नीला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार

बजरंगी भाईजानच्या मुन्नीला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार

कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजानमध्ये (Bajrangi Bhaijaan) मुन्नीची भूमिका करणाऱ्या हर्षाली मल्होत्राचा (Munni fame harshali malhotra) गौरव करण्यात आलाय. तिला 'भारतरत्न डॉ आंबेडकर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. तिनं तो बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला (salman khan) अर्पण केला आहे. बजरंगी भाईजानपासून हर्षालीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. ती आता सोशल मीडियावर देखील सक्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेयर करत असते. यापुढील काळामध्ये ती काही बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार अशी चर्चा आहे.

आपल्याला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं पुरस्कार मिळाला आहे. हे तिनं सोशल मीडियावरुन सांगितलं आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. हर्षालीनं इंस्टावर त्यासंबंधीचे काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंना कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे.

हेही वाचा: रविना टंडनने लग्नासाठी आपल्या पतीला घातली होती 'ही' अट...

हर्षालीच्या चाहत्यांनी लिहिलं आहे की, तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. तुझी प्रगती पाहून आनंद वाटला. यापुढील काळामध्ये तुझी यापेक्षा मोठी प्रगती होवो यासाठी शुभेच्छा. अशा शब्दांत तिचा गौरव करण्यात आला आहे. मुन्नीनं हा पुरस्कार दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता सलमान खान यांना अर्पण केला आहे. तिनं लिहिलं आहे की, माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला बजरंगी भाईजानमध्ये काम करण्याची संधी दिली होती. त्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. बजरंगी भाईजानमध्ये हर्षालीनं पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली होती.

हेही वाचा: "अभिनेता म्हणून तो मला आवडायचा पण.."; सिद्धार्थला सायनाचं सडेतोड उत्तर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top