बालाने मारला बॅाक्स ऑफिसवर डल्ला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

अवघ्या दोन दिवसांत तब्बल 25 कोटींची कमाई

 

मुंबई : सध्या आपल्या मनोरंजक चित्रपटांमुळे सुपरस्टार्सना टक्कर देणा-या आयुषमानचा 'बाला' चित्रपट 8 नोव्हेंवर रोजी प्रदर्शित झाला. अमर कौशिक यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात आयुषमानचे नाव बाला आहे. त्याला ऐन पंचविशीत केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. याच बालाची व्यथा या चित्रपटात मांडली आहे. 

'बाला' ने प्रदर्शनाच्या दिवशी १०.१५ कोटी तर दुसऱ्या दिवशी १५.७३ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आयुषमानसोबत भूमी पेडणेकर आणि यमी गौतम या दोघी अभिनेत्रींनी काम केले आहे. यात केसगळती एखाद्या तरुणासाठी किती त्रासदायक ठरु शकते आणि आपले टक्कल लपवण्यासाठी एक तरुण किती काय करतो या सगळ्याची गंमत दाखवली आहे. 

web title : bala movie collects good business on box office 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bala movie collects good business on box office