बालिका वधूच्या आनंदीचं बिकीनी फोटोशुट, फॅन्स म्हणाले काय हे !

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

 मालिकेतील सर्वांच्या आवडीची असणारी आनंदी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई - टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिका बालिका वधुनं प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटविला आहे. मालिकेचा विषय त्यातील पात्रं, कथा यामुळे ती नेहमीच चर्चेत राहणारी मालिका आहे असे म्हणता येईल. मालिकेतील सर्वांच्या आवडीची असणारी आनंदी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे तिचं बिकीनी शुट.

1. बालिका वधु मधील आनंदीला कोण ओळखत नाही, संस्कारी वधु म्हणून तिची एक नवी ओळख प्रेक्षकांमध्ये झाली आहे. अशा आनंदीचा हॉट अवतार भलताच चर्चेत आला आहे.

Balika Vadhu Actress Avika Gor's Bikini Pic Is Burning Up The Internet

2. नेहमी साडीत वावरणारी आनंदी म्हणजे अविका गौरच्या बिकीनी फोटोशुटला चांगलीच प्रसिध्दी मिळत आहे. आपल्या वेगवेगळ्या पोझेस मधल्या हॉट फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Balika Vadhu Avika Gor Bikini Look

3. अविकानं तिचा बिकीनीतील एक फोटो शेयर केला आहे. त्यात ती स्विमिंग पूल बाहेर सनबाथ घेताना दिसून आली आहे. 

Balika Vadhu Avika Gor Bikini Look

4.  तिच्या या फोटोंना शेकडो लाईक्स मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटही केल्या आहेत. त्यापैकी एकानं असे म्हटले आहे की,  'आनंदी बहू से बिकनी बेबी'. 

Image may contain: 1 person, closeup

5. आनंदीच्या फोटोंना 60  हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. अविकाला चाहत्यांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. मालिकेपेक्षा काही हटके करण्याचा तिचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

Image may contain: 1 person, standing

6. गेल्या काही दिवसांपासून मालिकेमुळे प्रसिध्दीस आलेल्या अविकानं आपल्या बिकीनी फोटो शुटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात तिनं आपण अधिक चर्चेत कसे राहू या दृष्टीनं प्रयत्न केला आहे. 

Image may contain: 1 person, closeup

7. अविकानं फिटनेससाठीही खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी ती करत असलेलं वर्कआऊट प्रचंड थकवणारे आहे. त्याबद्दलही तिनं सोशल मीडियावर लिहिलं आहे. अविका गेल्या वर्षी चर्चेत आली होती. त्यावेळी तिनं कमालीच्या वेगानं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

8.  ऑक्टोबरमध्येही अविका अशाच पध्दतीनं चर्चेत आली होती. तिनं तिच्या इंस्टाच्या अकाऊंटवर एक स्टोरी शेयर केली होती. त्यात आपण कशा पध्दतीनं वजन कमी केले होते याविषयी लिहिले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avika Gor (@avikagor)

9. अविका गौर ही सध्या मिलिंद चंदावनीला डेट करत असल्याची चर्चा आहे. तो एका एनजीओ कंपनीचा संस्थापर आहे. तसेच त्यानं रोडिजमध्ये भागही घेतला होता. तिच्या इंस्टावर दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balika Vadhu Actress Avika Gors Bikini Photoshoot viral fans commented