बन मस्का घेणार निरोप

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

तरुणाईची धडकन बनलेली बन मस्का ही मालिका  पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे .  प्रेक्षकांची आवडती बन मस्का ही मालिका , ९ जून ला झी युवावरून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

मुंबई : तरुणाईची धडकन बनलेली बन मस्का ही मालिका  पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे .  प्रेक्षकांची आवडती बन मस्का ही मालिका , ९ जून ला झी युवावरून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

या मालिकेने आजवर अनेकांचे हृदय जिंकले. यातील शिवराज आणि शिवानी  या दोघांनीही त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सौमित्र आणि मैत्रेयी या पात्रांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . मैत्रयीच्या आजीच्या भूमिकेतील ज्योती सुभाष यांना पाहून तर प्रत्येकालाच आपली आजी एवढीच कूल असावी ही भावनाही आली असेल. या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ते सौमित्रचे आई बाबा आणि भाऊ म्हणजेच राजू घटणे, अतिशा नाईक आणि आशुतोष गायकवाड असोत किंवा मैत्रियेचे आई बाबा म्हणजेच चिन्मयी सुमित,अभय असोत, या सर्वांची एक वेगळेच कनेक्शन प्रेक्षकांसोबत बनवले आहे.

ह्या मालिकेत  आजच्या तरुणाईची  बोली भाषा   लेखक संदेश कुलकर्णी आणि मनस्वी लता रवींद्र  ह्यांनी योग्य रित्या हेरली आहे . अनेक वेळा अतिशय स्पष्ट भाषा आणि त्याला  सडेतोड अभिनय दाखवण्यात पोथडी एंटरटेनमेंट चे प्रोड्युसर आणि मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांचाही  मोठा हातभार आहेच.

 

Web Title: ban maska on see yuva entertainment esakal news