पाकमध्ये 'रईस'च्या प्रदर्शनावर बंदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - चित्रपटातून मुस्लिम समाजाचे नकारात्मक चित्र दाखविण्यात आल्याचे कारण देत शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेल्या "रईस' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

नवी दिल्ली - चित्रपटातून मुस्लिम समाजाचे नकारात्मक चित्र दाखविण्यात आल्याचे कारण देत शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेल्या "रईस' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

"या चित्रपटात मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे आणि मुस्लिमांना गुन्हेगार, दहशतवादी आणि फरार दाखविण्यात आले आहे', असे कारण देत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत "डॉन' या पाकमधील वृत्ताने वृत्त दिले आहे. भारतीय चित्रपट दिग्दर्शक राहुल धोलाकिया यांनी या कारवाईमुळे धक्का बसल्याचे म्हणत ट्‌विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. "रईस'मध्ये शाहरूख खानसाबेत पाकिस्तानमधील अभिनेत्री महिरा खान हीनेही भूमिका साकारली आहे. पाकिस्तानमधील चित्रपट प्रमाणिकरण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) चित्रपटात आक्षेपार्ह दृश्‍ये असल्याचे म्हणत चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देता येत नसल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Ban on 'Raees' in Pakistan