'वीरे दि वेडींग'ला पाकिस्तानात बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सिनेमातील अश्लील संवाद और बोल्ड दृश्य असल्याने हा सिनेमा पाकिस्तानात दाखवण्यात येणार नाही.

'वीरे दि वेडींग' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. स्त्री केंद्री सिनेमा असला तरी भरपूर बोल्डनेस असलेला हा सिनेमा आजच्या काळातील स्त्रीचे जग, तीचा बदललेला विचारप्रवाह यावर सिनेमात दृश्य घेण्यात आली आहे. पाकिस्तानात मात्र हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. 

सिनेमातील अश्लील संवाद और बोल्ड दृश्य असल्याने हा सिनेमा पाकिस्तानात दाखवण्यात येणार नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर (CBFC) यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की, सी. बी. एफ. सी. च्या सभासदांनी एकमताने सिनेमाला सार्वजनिक प्रदर्शनास परवानगी न देण्याचे ठरवले आहे. सिनेमातील मजकूरावर सेन्सॉरशिप ऑफ फिल्म कोड 1980 नुसार आक्षेप घेण्यात आला आहे.
 
veere di wedding

गेल्या मंगळवारी (ता. 29) सी. बी. एफ. सी. साठी या 'वीरे दि वेडींग'चे स्क्रिनिंग झाले. मजकूरावरील आक्षेपानंतर सिनेमाच्या वितरण मंळानेही आपले अर्ज मागे घेतले आहे. शशांक घोष दिग्दर्शित या सिनेमातून शिखा तलसानिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. करिना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर या स्टार अभिनेत्री सिनेमात मुख्य भुमिकेत आहे. रिया कपूर, एकता कपूर आणि निखील द्विवेदी हे सिनेमाचे निर्माते आहेत. चार मैत्रीणींची ही कहानी आहे. 1 जून ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.    

veere di wedding

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ban On Veere Di Wedding In Pakistan