'बाप्पा'नेच मला संकटातून बाहेर काढले- सलमान

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे.

गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे.

सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो. माझी बहिण अर्पितामुळेच हे शक्य झाले आहे. अर्पिता लहान असताना तिने घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करू असे म्हटले होते. तेंव्हापासून ते आजपर्यंत आम्ही नियमीत गणपतीची प्रतिष्ठापना करतो. गणेशोत्सवादरम्यान कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन मोठा आनंदोत्सव सादरा करतो. बाप्पावर माझी मोठी श्रद्धा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यावर मोठ-मोठी संकटे आली होती. परंतु, बाप्पाने मला त्या संकटातून बाहेर काढले आहे.‘

दरम्यान, देशभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेकजण आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना दिसतात. यामध्ये अमिताभ बच्चन, विवेक ओबेरॉय, गोविंदा, कंगणा रणावत, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे.

Web Title: Bappa Salman me out of trouble

फोटो गॅलरी