‘बाराखडी’ च्या माध्यमातून युनायटेड किंगडममध्ये मराठी मनोरंजन विश्वाचे दालन!

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडमवासियांना दाखवायच्या उद्देशाने​ बाराखडी एंटरटेनमेंटस​'ची स्थापना केली. अमोघ धामणकर हे पुण्याच्या सिम्बॉयोसिसचे माजी विद्यार्थी असून, ​'​ मार्केटिंग अँड अ‍ॅडव्हरटाइजिंग ​'​ या विषयात त्यांनी एमबीए केले आहे. 

पुणे : युनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ​'​ बाराखडी एंटरटेनमेंटस​'ने पुढाकार घेतला आहे. मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडमवासियांना दाखवायच्या उद्देशाने ​ ​'​ बाराखडी एंटरटेनमेंट ​स​'ची  स्थापना केली असल्याची माहिती लंडनमधील ​ ​ ​'​ बाराखडी एंटरटेनमेंट ​स​'  चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी दिली.
 
अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडमवासियांना दाखवायच्या उद्देशाने​ बाराखडी एंटरटेनमेंटस​'ची स्थापना केली. अमोघ धामणकर हे पुण्याच्या सिम्बॉयोसिसचे माजी विद्यार्थी असून, ​'​ मार्केटिंग अँड अ‍ॅडव्हरटाइजिंग ​'​ या विषयात त्यांनी एमबीए केले आहे. 

2016 मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा ​'​बाराखडी एंटरटेनमेंट​स​'ने इंग्लंडमधील 25 ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे 75 शो झाले. ​'​ ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड '​कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला ! अशा तर्हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.

‘मराठी चित्रपट, नाटक, मनोरंजन विश्वाला युनायटेड किंगडममध्ये चांगले व्यासपीठ मिळवून देणे हा ​ ​ ​'​ बाराखडी एंटरटेनमेंटस​'च्या स्थापनेमागचा उद्देश असल्याचे’ अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी सांगितले. नाटक, स्टेज शो, चित्रीकरण, टीव्ही शो, पारितोषिक वितरण सोहळे अशा सर्व गोष्टींसाठी हे व्यासपीठ ते उपलब्ध करून देणार आहेत.

युनायटेड किंगडम मध्ये (इंग्लंड, वेल्स्, स्कॉटलंड, नॉर्दर्न आयर्लंड) साधारण  ​१०​ हजार इतके मराठी रसिक राहतात. त्यांच्या पर्यंत विविध उपक्रमाद्वारे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

नोव्हेंबर 2016 मध्ये ‘बाराखडी एंटरटेनमेंट’यांचा ‘लई बाराचे’हा कार्यक्रम 4 ठिकाणी झाला. त्यात कुशल बद्रीके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शो च्या चित्रीकरणात त्यांनी लंडनमध्ये मदत केली. या पार्श्वभूमीवर ‘चला हवा येऊ द्या’ चा खास प्रयोग रविवार दि. 12 नोव्हेंबरला ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये होत आहे. लंडन शो साठी ‘झी मराठी’, ‘वीणा वर्ल्ड’, ‘रॅपचिक’, रोटीमॅटीक, नक्षी डॉट कॉम यांचे सहकार्य लाभत आहे.

लंडनमधील ‘ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत. ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये ’बाराखडी एंटरटेनमेंट’चा हा खास शो होणार आहे. यामध्ये डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शो मध्ये सहभागी होणार आहेत.

Web Title: barakhadi in UK esakal news