स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन यांनी केलंय सुदंर ट्विट 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 15 August 2020

भारत आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे.

नवी दिल्ली- भारत आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे. सध्याच्या स्वातंत्र्यदिवसावर कोरोनाचे सावट असले तरी लोकांमध्ये जोश कायम आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. यात भारताचा तिरंगा म्हणून गाजर, मुळा आणि भेंडी यांना एकत्र करुन झेंडा तयार करण्यात आला आहे. 

1947मध्ये भारतात पेट्रोल किती रुपयांना मिळत होतं? वाचा 74 वर्षांत बदललेला भारत

भारतीयांना स्वतंत्र दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भारताचे ह्रदय, तिरंग्यापासून दूर राहू शकत नाही, मग तो कोणत्याही स्वरुपात असो किंवा मिळो, असं कप्शन अमिताभ बच्चन यांनी या फोटोला दिलं आहे. एका भाजी विक्रेत्याने तिरंगा म्हणून गाजर, मुळा आणि भेंडी यांना एकत्र जोडले आहे. गाजराचा लाल रंग, मुळीचा पांढरा रंग आणि भेंडीचा हिरवा रंग अशा स्वरुपात विक्रेत्याने झेंडा दाखवला आहे.

Image

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A beautiful tweet by Amitabh Bachchan wishing freedom