सौंदर्याचा मोह नडला; ब्युटी क्वीनचं करिअर झालं उद्ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

आपण अधिक सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरले जातात. सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक अभिनेत्री आणि  मॉडेल विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. या प्रॉडक्ट्समुळे रूप आणखी खुलेल असा दावा या प्रोडक्टच्या कंपन्या करत असतात.

आपण अधिक सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरले जातात. सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक अभिनेत्री आणि  मॉडेल विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. या प्रॉडक्ट्समुळे रूप आणखी खुलेल असा दावा या प्रोडक्टच्या कंपन्या करत असतात. या ब्युटी प्रॉडक्ट्सचे जितके फायदे आहेत तितकेच नुकसान आहे. अनेक ब्युटी क्रीमचे साइड इफेक्ट असतात. अशाच एका ब्युटी क्रीममुळे मॉडेलचे पूर्ण करिअर संपले आहे. सौंदर्याच्या मोहामुळे एका मॉडेलला मोठा फटका बसला आहे. 

Image may contain: 2 people

आफ्रिकेची ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी 25 वर्षाची मरियमा डायलो हिचा चेहरा एका ब्युटी प्रॉडक्टमुळे पूर्ण खराब झाला आहे. या ब्युटी प्रॉडक्टमुळे मारियमच्या चेहऱ्यावर डाग आणि फोड आले आहेत. स्वित्झरलँडच्या एका ब्युटी कंपनीच्या प्रोडक्टमुळे असे झाल्यामुळे मारियमने या ब्युटी प्रॉडक्टच्या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मारियमचे वकील नचीमोवस्कीने कोर्टत याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. मारियमचा चेहरा खराब झाल्यामुळे तिने स्किन स्पेशलिस्टचे मत घेऊन तिच्या स्किन ट्रीटमेंटची सुरूवात केली आहे.पण ही ट्रीटमेंट  खूप महाग असून या उपचार पद्धतीला खूप वेळ लागणार आहे. 

प्रतिक गांधी दिसणार मर्डर मिस्ट्री असलेल्या वेबसिरीजमध्ये

गेल्या 3 वर्ष मारियम  मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावण्यासाठी प्रयत्न करत होती. तिने मिस गिनी (Miss Guinea), मिस वेस्ट अफ्रीका आणि  मिस वर्ल्ड प्रेजेंट या स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला आहे. तसेच केल्विन क्लेन आणि नाइकी यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी तिने शूट केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beauty cream side effect destroyed beauty queens career