सहा वर्षे डेट केल्यावर या कारणाने सुशांत आणि अंकिताचा 'पवित्र रिश्ता' तुटला

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

फेमस कपल म्हणजे सुशांत सिंग राजपुत आणि अंकिता लोखंडे. या दोघांची ल्व्हस्टोरी नेहमीच चर्चेत राहिली. जाणून घ्या नक्की कोणत्या कारणामुळे सुशांत आणि अंकिता यांच्या लव्हस्टोरीचा दि एण्ड झाला. 

मुंबई : रिलेशनशिप, रोमान्स आणि ब्रेकअप यांमुळे बॉलिवूड अनेकदा चर्चेत असतं. अनेक वर्ष डेट करुन हे कलाकार लग्नबंधनात अडकतात. पण, अनेक वर्षे डेट करुनही अनेकांचे ब्रेकअप होतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांची लव्हस्टोरी अधूरी राहिली. त्यामधलं फेमस कपल म्हणजे सुशांत सिंग राजपुत आणि अंकिता लोखंडे. या दोघांची ल्व्हस्टोरी नेहमीच चर्चेत राहिली. चाहत्यामध्ये त्यांच्या ब्रेकअपमुळे नाराजी होतीच आणि त्याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकतादेखील कायम आहे. जाणून घ्या नक्की कोणत्या कारणामुळे सुशांत आणि अंकिता यांच्या लव्हस्टोरीचा दि एण्ड झाला. 

अंकिता आणि सुशांत एकावेळचे 'पावर कपल' होते. या कपलची चाहत्यांमध्ये पसंती सर्वाधिक होती. पण, काही वर्षानंतर त्यांच्यातील संबंध बिघडू लागले आणि अखेर नातं तुटलं. अभिनेत्री अंकिता आणि सुशांत यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. झी टीव्हीवरील या सुप्रसिद्ध मालिकेने दोघांनी करीअरला सुरुवात केली. या मालिकेमध्ये दोघं नवरा बायकोची भूमिका साकारत होते.

Image may contain: 2 people, people smiling, close-up

सेटवर एकत्र आणि एकत्र काम करत असतानाच त्यांची मैत्री झाली. हळुहळु या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते दोघं डेट करायला लागले. त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मालिकेतल्या 'मानव-अर्चना' या नावाने त्यांच्या जोडीला लोक ओळखू लागले आणि पसंतही करु लागले. 

Image may contain: 2 people, people smiling, people sitting

रिलेशनशिपमध्ये असताना दोघांचं प्रेम किती आहे अनेकदा लोकांसमोर येत होतं. त्यावेळी कपलने 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी हे कपल एकमेकांच्या प्रेमात बुडले होते. रोमॅंटीक सुशांतने या शोमध्येच अंकिताला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. 

Image may contain: 2 people, people smiling, people sitting and outdoor

सुशांत आणि अंकिता 2011 मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हे दोघं 2016 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चाही होत्या. पण, त्याच वर्षी दोघांचा ब्रेकअप झाला. दोघांच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. करीअर घडवत असताना अनेक बदल झाले. कदाचित हेच उतार-चढाव या कपलला सांभाळणे कठीण होऊन बसलं. सुशांत त्यानंतर बॉलिवूडकडे वळला.

Image may contain: 2 people, people smiling, people standing and suit

त्याला अनेक ऑफर येण्यास सुरुवात झाली. पण, अंकिताकडे त्यावेळी कोणता मोठा प्रोजेक्ट नव्हता. सुशांत चित्रपटसृष्टीकडे वळला आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला. असंही बोललं जात होतं की अंकिता सुशांतसाठी खूप जास्त पसेसिव्ह होती. त्यामुळे नात्यामध्ये दरी निर्माण झाली. याविषयी दोघांनी कधीच मोकळेपणाने खुलासा केला नाही.

Image may contain: 1 person, sitting, beard and indoor

सुशांतचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिती सॅननशई जोडलं गेलं होतं. पण, सध्या तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे. त्या दोघांनी अधिकृतपणे ही माहिती दिली नसली तरी त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सुशांत पिके, शुद्ध देसी रोमान्स, काय पो चे, राबता, केदारनाथ, एम.एस्.धोनी आणि छिछोरे अशा सुपरहिट सिनेमांमधून झळकला आहे. 

Image may contain: 1 person, standing

तर, अंकिताने एक थी डायन, मनीकर्णीका मधून झळकली. लवकरच ती टायगर श्रॉफच्या 'बागी 3' मध्ये दिसणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: because of this reason After dating for six years ankita and sushant singh got separated