'या' कारणामुळे विकीने कमी केले वजन

'या' कारणामुळे विकीने कमी केले वजन

मुंबई : अगदी कमी कालावधीत एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देण्यात अभिनेता विकी कौशल यशस्वी ठरला. विकीकडे सध्या बिग बजेट हिंदी
चित्रपटांची रांग लागली आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे सरदार उधम सिंह यांचा बायोपिक. विकी सध्या या चित्रपटाच्या जोरदार तयारीला लागला आहे.

या चित्रपटासाठी त्याने तब्बल १३ किलो वजन कमी केले आहे. उधम सिंह यांची भूमिका रुपेरी पडद्यावर अगदी जिवंत वाटावी यासाठी तो त्याच्या फिटनेसकेडही लक्ष देत आहे. उधम सिंह यांचा संपूर्ण जीवनप्रवास बायोपिकमध्ये दाखवण्यात येणार आहे. म्हणूनच त्यांच्यासारखे हुबेहूब दिसण्यासाठी विकीची धडपड सुरू आहे. 

त्याशिवाय विकीच्या हाती एक हॉरर चित्रपटही आहे; पण तो सध्या उधम सिंह यांच्या बायोपिकसाठी घेत असलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.  

web title : Because of this viki reduceded his weight

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com