
एखादा चित्रपट पाहायला गेल्यानंतर त्यातील कलाकाराची भूमिका करण्याची त्यांची सवय होती. त्यांनाही कधी वाटले नव्हचे की आपण एका दिवशी एवढे मोठे कलाकार होऊ.
मुंबई - काही अभिनेते वेगळेच असतात. त्यांचे बोलणे. त्यांचा अभिनय याशिवाय सेलिब्रेटी म्हणून मिरवणे हे नेहमीच विचार करण्यास प्रवृत्त करणारे असते. अशाच एका खास अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.आता त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या अभिनयातील उंची लक्षात येते. बोमण इरानीचा संघर्ष हा काही वाटतो तितका सोपा मुळीच नव्हता. अथक परिश्रम्राने त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलं. मात्र त्याची मोठी किंमतही त्याला चूकवावी लागली हे विसरुन चालणार नाही.
1. बोमण इराणीचा मुन्नाभाई एमबीबीएस आठवतोय त्यात त्यानं ज्यापध्दतीनं अभिनय केला होता त्याला तोड नव्हती. राग आल्यानंतर खळखळून हसणा-या बोमणचा तो अभिनय कमालीचा होता. एक वेगळ्याच प्रकारची भूमिका त्यानं त्या चित्रपटात केली होती. ती प्रेक्षकांना आवडलीही होती.
2. संजय दत्त, आमिर खान यांच्यासारख्या दिग्गज कलांकारासोबत काम करतानाही आपल्या अभिनयानं वेगळी ओळख तयार करणा-या बोमण यांचा प्रवास संघर्षमय आहे. आता ते एका ज्येष्ठ कलाकाराच्या भूमिकेत जरी असले नवोदित कलाकारांना आपल्या अनुभवाचा फायदा ते करुन देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
3. थ्री इडियटस मधील वायरस चे त्यांनी रंगवलेली भूमिका क्लासिक प्रकारातील म्हणता येईल. एक जगावेगळा प्राध्यापक, त्याची शिकविण्याची अनोखी पध्दत आणि त्याची फिलोसॉफी हे बोमणनं मोठ्या ताकदीनं उभं केलं. विशेषत या चित्रपटातील व्हायरसच्या भूमिकेनं त्यांना पुन्हा नवा एक चेहरा दिला.
4. बोमण इराणी हे त्यांचा 61 वा जन्मदिवस साजरा करत आहेत. त्यांचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे. त्यांच्या अभिनयाची धाटणी वेगळी आहे. त्याचा बाज वेगळा आहे. आपल्या या सर्व गोष्टींची माहिती करुन घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
5. लहानपणापासून बोमण यांना चित्रपटात काम करण्याची हौस होती. जन्माच्या अगोदरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. चित्रपटात काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. एखादा चित्रपट पाहायला गेल्यानंतर त्यातील कलाकाराची भूमिका करण्याची त्यांची सवय होती. त्यांनाही कधी वाटले नव्हचे की आपण एका दिवशी एवढे मोठे कलाकार होऊ.
6. पारशी कुटूंबात जन्माला आलेल्या बोमन यांनी आपले शालेय शिक्षण सेंट मेरी स्कूल मधून शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातून पॉलिटेक्निक डिप्लोमा केला आहे.
हे ही वाचा: लॉकडाऊन दरम्यान वाढल्या अभिषेकच्या 'या' भूमिकेतील अडचणी, चूक झाल्यास झाली असती मोठी गडबड
7. हॉटेल मॅनेजमेंट केल्यावर ते हॉटेल ताजमध्ये वेटरचे काम करायचे. याठिकाणी त्यांनी दोन वर्षे वेटर आणि रुम सर्विसचे काम पाहिले. त्यांची कामाप्रती असणारी बांधिलकी लक्षात घेऊन त्यांना बढतीही मिळाली होती. यानंतर त्यांनी फ्रेंच हॉटेल Rendezvous मध्येही काम केले.
8. ताजमध्ये असताना बोमण इराणी हे ग्राहकांकडून मिळणारी टीपही जमा करायचे. त्यातून त्यांनी एक कॅमेरा विकत घेतला. आणि सुट्टीच्या दिवशी क्रिकेट, फुटबॉल मॅचेसचे फोटो काढण्याचे काम ते करायचे.
9. त्यावेळी साधारण 20 ते 30 रुपयांमध्ये फोटो विकण्याचे काम ते करीत होते. सात वर्षांची कमाई एकत्र केल्यानंतर त्यांनी फॅमिली व्हॅकेशनचे प्लॅनिंग केले. तेव्हा ते उटीला गेले. मात्र कमी पैसे असल्यामुळे त्यांना एका छोट्या घरात जागा मिळाली.
10. वेटर आणि फोटोग्राफीनंतर 2000 मध्ये बोमन इराणी यांनी चित्रपटांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांची सुरुवात ही डरना मना है या चित्रपटापासून झाली होती. अतिशय कमी वेळेची भूमिका त्यांच्या वाट्याला आली असतानाही त्यांनी लक्षवेधी अभिनय केला होता.