ही अभिनेत्री म्हणतेय, मला ऑफिसला बोलावलं अन् तो सुरु झाला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

दिल्ली : काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या #Metoo या मोहिमेमुळे एकच खळबळ उडाली होती. या मोहिमेचे लोण बाॅलिवूडपासून थेट मराठी चित्रपट सृष्टीपर्यंतही पोचले होते. आजही या मोहिमेव्दारे अनेक अभिनेत्री खळबळजनक खुलासा करत आहेत. 

नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर

दिल्ली : काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या #Metoo या मोहिमेमुळे एकच खळबळ उडाली होती. या मोहिमेचे लोण बाॅलिवूडपासून थेट मराठी चित्रपट सृष्टीपर्यंतही पोचले होते. आजही या मोहिमेव्दारे अनेक अभिनेत्री खळबळजनक खुलासा करत आहेत. 

नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर

बॉलिवूडनंतर #Metoo आता ही मोहिम बंगाली सिनेसृष्टीतही पोहोचली आहे. बंगाली सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री रूपंजना मित्राने कथित आणि मोठ्या बंगाली सिनेमाचे दिग्दर्शक अरिंदम सील यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहे.

आनंद बाजार डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत रूपंजना मित्राने खुलासा केला आहे की,  लोकप्रिय मालिका 'भूमिकन्या' च्या स्क्रिप्ट वाचण्यासाठी कोलकाता येथील ऑफिसमध्ये बोलावून अरिंदम सील यांनी गैरवर्तन केले.

Image result for bengali actress rupanjana mitra

या अभिनेत्रीने एबीपी डिजिटलला सांगितलं की, अरिंदम सील यांनी आपल्या ऑफिसमध्ये 'भूमिकन्या' च्या पहिल्या भागाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी बोलावलं होतं. ही घटना दुर्गा पूजा होण्याच्या काही दिवसांआधी घडली. जेव्हा संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते पण तिथे कुणीही नव्हतं. मला खूप भीती वाटली होती. पण अचानक अरिंदम आपल्या जागेवरून उठले आणि माझ्या बाजूला येऊन बसले. त्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवण्यास सुरुवात केली. ऑफिसमध्ये आम्ही दोघेच होतो. मला भीती वाटत होती ही मी वाचणार नाही. मी देवाला प्रार्थना करत होती की, कुणी तिथे येईल.'

'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवरही फडकावला झेंडा; पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

तिने पुढे सांगितलं की, काही वेळानंतर मला हे असह्य झालं. मी त्यांच्याशी स्क्रिप्टवर बोलण्याचं सांगितलं. त्यांना याची जाणीव झाली असावी की मला हे आवडलेलं नाही. त्यानंतर ते तिथून बाजूला झाले आणि स्क्रिप्टबद्दल सांगण्यास सुरूवात केली. त्यानंतर 5 मिनिटांनी त्यांची पत्नी तिथे आली.' या प्रकारमुळे रूपंजना यांना मानसिक धक्का बसला होता.

तर अरिंदम सील यांनी रूपंजनाने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हा काही राजकीय स्टंट असू शकतो. मला माहिती नाही की रूपंजना हे कशासाठी करत आहे. आम्ही जुने मित्र आहोत. ती ज्या दिवशीची गोष्ट करत आहे. त्या भेटीनंतर तिथून गेल्यानंतर तिने मला एसमएमस करून 'काम करण्यासाठी आपण उत्साहित आहे' असं सांगितलं होतं. अजूनही तो मॅसेज माझ्याकडे आहे आणि मी तो कुणालाही दाखवू शकतो. जर तिच्यासोबत कुणी गैरव्यवहार केला असेल तर त्या माणसाला रुपंजनाने मॅसेज का केला? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengali actress rupanjana mitra names filmmaker arindam sil in metoo allegations of sexual misconduct