सलमान खान बॉलिवूडमधील बेस्ट ऍक्‍शन हिरो :जॅकी चॅन

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जॅकी चॅनचे भारतात आगमन

जॅकी चॅनचे भारतात आगमन

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये जबरदस्त फाइटिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उसाहात सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबई विमानळावर सोमवारी जॅकी चॅन यांचे दणक्‍यात स्वागत करण्यात आले. या चित्रपटात बॉलिवूड हिरो सोनू सूददेखील दिसणार असून चॅन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होता. जॅकी चॅन यांचे सध्या भारतात प्रसिध्दीपूर्व कार्यक्रम सुरू असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी बॉलिवूडविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना अत्यंत खुल्या मनाने उत्तरे दिली. यावेळी एका प्रश्‍नाला उत्तर देताना चॅन म्हणाले,""सलमान खान बॉलिवूडमधील बेस्ट ऍक्‍शन हिरो आहेत.'' सलमान खाननेदेखील काही दिवसांपूर्वीच जॅकी चॅन आणि सोनू सूद यांच्या "कुंग फू योगा' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता.
जॅकी चॅन यांच्या भारत दौऱ्याची चर्चा काही दिवसांपासूनच बी टाऊनमध्ये रंगत होतीच. सोनू सूदनेही जॅकी या विषयीची उघड चर्चा केली होती.
"कुंग फू योगा' या चित्रपटामध्ये साहसीदृश्‍ये, थरार आणि विनोद असा सर्व मसाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये सोनू सूद आणि दिशा पटानी यांच्या रुपाने बॉलिवूडचा तडकाही असणार आहे. बीजिंग, दुबई आणि आयलॅण्डनंतर तसेच जोधपुरमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे. जॅकी चॅन यांचा हा बहुचर्चित चित्रपट तीन फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार विविध देशांतील चित्रपटसृष्टीतही आपले स्थान भक्कम करण्यास प्राधान्य देत आहेत. काही दिवसांपूर्वीच हॉलिवूडचा ऍक्‍शन स्टार विन डिझेल त्याच्या"ट्रीपल एक्‍स' या चित्रटपटाच्या प्रसिद्धीसाठी भारतात आला होता.

Web Title: Best Action hero Salman Khan in bollywood : jackie chan