'भाभीजी घर पर है' फेम वैभव म्हणाला, 'त्यावेळी मी पाणी देखील मागुन प्यायलं'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 6 November 2020

'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत वैभव माथुरने टीकाराम ही भूमिका साकारलीये. सध्या ही चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. मात्र वैभवचा मनोरंजनविश्वात येण्याचा प्रवास सहज सोपा नव्हता.

मुंबई- 'भाभी जी घर पर हैं' ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय, हजरजबाबीपणा आणि कॉमेडी सेन्सच्या जोरावर प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता वैभव माथूरचं. 

हे ही वाचा: साऊथ सुपरस्टार विजयने वडिल चंद्रशेखर यांच्या राजकिय पक्षातून घेतली एक्झिट'

'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत वैभव माथुरने टीकाराम ही भूमिका साकारलीये. सध्या ही चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. मात्र वैभवचा मनोरंजनविश्वात येण्याचा प्रवास सहज सोपा नव्हता. नुकतंच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वैभवने त्याचा संघर्षाने भरलेला प्रवास सांगितला.

वैभव म्हणाला,  ''सुरुवातीच्या काळात काम मिळावं यासाठी मी अनेकांच्या भेटी घेतल्या. मात्र कुठेच काम मिळत नव्हतं. पण कधी ना कधी तरी काम मिळेल हा आशावाद कायम माझ्यासोबत होता. अनेक ऑडिशनसाठी मी पायी प्रवास केला. त्यावेळी ध्येयाने झपाटलेलो होतो. एक उत्साह होता. त्यामुळे अनेक मैलांचं अंतर सहज हसत हसत पार केलं. अनेकदा वाटेत तहान लागायची मग एखादं चहाचं दुकान शोधून किंवा वाटसरुकडून पाणी मागुन प्यायचो. त्यावेळी बिसलरी घ्यावी इतके पैसे देखील नसायचे'' असा अनुभव वैभवने शेअर केला.

दरम्यान, वैभव माथूर 'भाभीजी घर पर है' या मालिकेत टीकाराम ही भूमिका करत असून आज तो लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. कॉमेडी सेन्सच्या जोरावर वैभवने अनेकांंच्या मनात घर केलं आहे.

bhabhi ji ghar par hai tikaram aka vaibhav mathur shares his struggle story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhabhi ji ghar par hai tikaram aka vaibhav mathur shares his struggle story