भाभीजी, एवढं बोल्ड बेबी बंप फोटोशुट असतं का?|Bhabiji Ghar Par Hai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhabiji Ghar Par Hai

Bhabiji Ghar Par Hai : भाभीजी, एवढं बोल्ड बेबी बंप फोटोशुट असतं का?

Bhabiji Ghar Par Hai actress Vidisha Srivastava Is Pregnant : टीव्ही मनोरंजन क्षेत्रात काही मालिकांनी बऱ्याच काळापासून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. भाभीजी घर पर है या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. आता या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवची गुड न्यूज समोर आली आहे. तिनं याविषयी तिची प्रतिक्रिया देखील व्हायरल केली आहे.

विदिशाच्या त्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठ प्रतिसाद मिळाला आहे. त्या फोटोंमध्ये देखील विदिशानं बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. विदिशा ही तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. यावेळी तिनं तिची गुड न्यूज सांगत केलेलं बेबी बंप फोटोशुट मात्र नेटकऱ्यांच्या पसंतीचा विषय ठरतो आहे. इंस्टावर अनीता भाभी फेम विदिशाला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. विदिशानं तिची गुड न्युज सांगितल्यावर चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

विदिशा तिच्या प्रेग्नंसीची ती फेज चांगलीच इंजॉय करताना दिसते आहे. त्यावर तिला आलेल्या कमेंटस देखील भन्नाट आहेत. बऱ्याच दिवसांपासून विदिशा श्रीवास्तवच्या प्रेग्नंसीविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यावर तिनेच फोटो टाकून नेटकऱ्यांना परखड शब्दांत उत्तरही दिले आहे. अर्थात त्या फोटोंवरुन तिला ट्रोल देखील व्हावे लागले आहे. मात्र नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना घाबरेल ती विदिशा कसली...

तिचं ते फोटोशुट पाहून नेटकऱ्यांना मात्र आश्चर्य वाटले आहे. तिच्या चाहत्यांनी देखील अशा प्रसंगात असे फोटोशुट करण्याची गरज आहे का असं विदिशाला विचारले आहे. विदिशानं तिच्या फोटोंसाठी रेड कलरच्या ड्रेसची निवड केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. भाभीजी घर पर है या मालिकेमध्ये विदिशानं नेहा पेंडसेची जागा घेतली आणि ती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे दिसून आले.