
Bharat Jadhav : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही ! भरत जाधवने हात जोडून मागितली माफी, जाणून घ्या प्रकरण Video Viral
Bharat Jadhav News: भरत जाधव हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. भरत जाधव सध्या मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. पण रत्नागिरीत भरत जाधव यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान भीषण अनुभव आलाय.
अभिनेता भरत जाधव यांनी केली जाहिर नाराजी व्यक्त रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव झाला नाराज. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही.
(bharat jadhav big announcement that he will not do natak show again in ratnagiri, know what is the reason)
भरत जाधवांचा काल रात्री होता तू तू मी मी हा नाट्यप्रयोग रत्नागिरीत होता. त्यावेळी AC आणि साउंड सिस्टीम नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत.
"AC नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा", असं म्हणत भरत जाधवांनी प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं म्हणत भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत केलं जाहिर.
भरत जाधव यांनी याआधी सुद्धा नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठवला आहे. भरत जाधव सध्या तू तू मी मी नाटकात काम करत आहेत. या नाटकात भरत जाधव सोबत कमलाकर सातपुते, ऐश्वर्या शिंदे, रुचिरा जाधव, निखिल चव्हाण असे कलाकार झळकत आहेत.
केदार शिंदे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. या नाटकाचे सध्या महाराष्ट्रभर प्रयोग होत आहेत. आता भरत जाधव यांनी यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, या घोषणेचे पुढे कसे प्रतिसाद उमटतात हे पाहणं चर्चेचा विषय आहे.