Bharat Jadhav: 'मोरूची मावशी' पोहोचली अमेरिकेत.. भरत जाधवची खास पोस्ट..

अभिनेता भरत जाधवला लागली लॉटरी, अमेरिकेत करतोय भरगोस शो..
bharat jadhav shared post about moruchi mavshi shows in america
bharat jadhav shared post about moruchi mavshi shows in americasakal
Updated on

Bharat jadhav: नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील नाना माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. तो सोशल मीडियावर सक्रिय असला तरी भारंभर पोस्ट टाकण्याऐवजी महत्वाच्या आणि लक्षवेधी पोस्ट तो टाकत असतो. भरतने आजवर त्यांच्या अकाऊंटवरुन कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य केले आहे. कधी मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कधी एखादे निमित्त साधून आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी भरभरून लिहितो. आज त्याने त्याच्या अमेरिका दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. हा काही फक्त साधा दौरा नाही, तर भरतच्या 'मोरूची मावशी' या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार आहेत. (bharat jadhav shared post about moruchi mavshi shows in america)

आचार्य अत्रे लिखित सुपरहिट नाटक 'मोरूची मावशी' चा पहिला प्रयोग १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. त्यावेळी त्यात मावशीची भूमिका साकारली होती बापूराव माने यांनी. काही वर्षानंतर हेच नाटक नव्या संचात करायचं ठरलं आणि मावशीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना पण त्यांनी नाव सुचवलं ते विजय चव्हाण यांच. आणि विजू मामांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. विजू मामा अक्षरशः जगले ती भूमिका. मावशी साकारावी तर ती विजू मामांनीच. त्यांच्यानंतर मावशी साकारायची संधी भरत जाधवला मिळाली. भरतनेही ती भूमिका जीव ओतून केली. या नाटकाचे शेकडो प्रयोग भरतने भारतभर केले. आता हे नाटक चक्क अमेरिकेत पोहोचले आहे. त्याच संदर्भात भरतने पोस्ट केली आहे.

bharat jadhav shared post about moruchi mavshi shows in america
Bigg Boss Marathi 4: लागली प्रेमाची चाहूल? त्रिशूलनं समृद्धीला दिलं 'हे' वचन..

भरतचे हे नाटक प्रचंड विनोदी आहे. तो या नाटकात कांदा संस्थानच्या राणीची म्हणजेच मोरुच्या मावशीची भूमिका साकारत आहे. या नाटकाला अमेरिकेतही तुफान प्रतिसाद आहे. या नाटकविषयीची पोस्ट शेअर करत भरत म्हणतो, 'मावशी दाखल झालीये अमेरिकेत..!!! पाच आठवडे, 15 प्रयोग, फुल्ल ऑन टांग टिंग टिंगा..' यासोबतच त्याने सर्व प्रयोगांचे तपशील दिले आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com