Bharti Singh: मुलावर लक्ष ठेवण्यासाठी घरात लावले 'कॅमेरे'! |Bharti Singh CCTV Camera for boy Lakshaya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharti Singh CCTV Camera for boy Lakshaya

Bharti Singh: मुलावर लक्ष ठेवण्यासाठी घरात लावले 'कॅमेरे'!

Bharati Singh Delivery: बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी झपाट्यानं बदलत चालल्या आहेत. त्याचा परिणाम व्यक्तीच्या शाररिक आणि मानसिक (Tv Entertainment News) आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे डिजिटलायझेशनच्या आहारी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. स्मार्ट लाईफच्या (Video Viral) नावाखाली आपण बऱ्याचदा काय करतो आहोत याचे भान हरवत चालल्याचे पाहायला मिळते. मनोरंजन विश्वही त्याला काही अपवाद नाही. सध्या टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री भारती सिंग आणि तिचा गोलू यांची चर्चा आहे. हर्ष लिंबाचिया आणि भारतीनं शेयर केलेल्या गोलूच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीनं गोलूचा गोकुळाष्टमी लूक शेयर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता भारती आणि हर्ष चर्चेत आले आहे. त्याचे कारण त्यांनी गोलूवर वॉच ठेवण्यासाठी घरात चक्क सीसीटीव्ही बसवले आहेत. ही गोष्ट नेटकऱ्यांना कळताच त्यांनी त्या दोन्ही सेलिब्रेटींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुलाला घरी सोडून कामावर जाणाऱ्या भारतीनं म्हटले आहे की, माझा मुलगा घरी एकटा नाही. माझं कुटूंब त्याची काळजी घेण्यास समर्थ आहे. माझी भाची त्याच्याजवळ आहे. आम्ही आता सीसीटीव्ही देखील लावले आहेत.

भारतीला नेटकऱ्यांनी या सीसीटिव्ही प्रकरणात ट्रोल केले आहे. त्यामुळे तिला सविस्तरपणे आपली भूमिका मांडावी लागली आहे. त्याचं काय आहे सध्याच्या घडीला काम जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे अशा गोष्टी करणं भाग आहे. गोलूच्या काळजीसाठी आम्ही हा निर्णय घेतल्य़ाचे भारतीनं म्हटले आहे. कॉमेडी क्वीन ही दोन महिन्यानंतर पुन्हा कामावर परतली आहे. एवढ्या लवकर कामावर आल्यानं नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तिला काही प्रश्नही विचारले होते. भारती तुला लेकराची काळजी नाही का अशी विचारणा केली होती.

हेही वाचा: Ketki Chitale: केतकी पुन्हा आली! फेसबूक 'ॲक्सिस' मिळाला

भारतीचं म्हणणं आहे की, तिला तिचा वर्कलोड हा कमी करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून पेंडिंग काम आहेत. ती पूर्ण करायचा आहे. गोलूच्या काळजीसाठी घरात माणसे आहेत. काही झालं तर आम्ही आता सीसीटिव्ही घरात बसवल्याचे भारतीनं म्हटले आहे. भारती ही एप्रिलमध्ये प्रेग्नंट झाली. तिनं आपल्या मुलाचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे.

हेही वाचा: Viaan Shetty: शिल्पा शेट्टीचा 10 वर्षांचा विहान झाला बिझनेसमन, स्टार्ट अप सुरु!

Web Title: Bharti Singh Cctv Camera For Boy Lakshaya Alias Golu Works On Set Harsh Take Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..