भारतीनं केला पती हर्षसोबतच्या जोरदार भांडणाचा खुलासा, तो मला...

Bharti Singh
Bharti SinghBollywood news

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) होऊन तीन दिवस झाले आहेत, परंतु असे सेलिब्रिटी आहेत जे अजूनही 'व्ही डे' च्या कथा आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. अलीकडेच कॉमेडियन भारती सिंहने (Bharti Singh) सांगितले की, या खास दिवशी तिचा पती हर्षने (Harsh Limbachiyaa) तिला रडवले, जरी नंतर हर्षला त्याची चूक समजली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

भारतीने तिच्या यूट्यूब (Youtube) चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहत्यांशी संवाद साधताना भारतीने खुलासा केला की हर्षने तिला सकाळी शुभेच्छा दिल्या नाहीत. ती म्हणाली की त्या दिवशी तिला तिच्या स्त्रीरोग तज्ञाकडे चेकअपसाठी जायचे होते. भारतीने व्हॅलेंटाईन डेला लाल रंगाचा ड्रेसही घातला होता आणि सिग्नलला फुले विक्रेत्यांना पाहून तरी कदाचित हर्षला आठवण येईल असे तिला वाटले.

मात्र, हर्ष कारमध्ये तिच्याशी अजिबात बोलला नाही, ज्यामुळे ती निराश झाली. वाटेत अनेक फूल विक्रेते आले, पण आज व्हॅलेंटाईन डे असल्याचे हर्षला आठवत नव्हते. ''मी खूप अस्वस्थ आहे. आता तर घरीही जवळ आले आहे, ना फुले घेतली ना काही. हर्षने माझ्यासाठी काहीच केले नाही.'' भारती म्हणाली. पण, हर्षने त्याच्यासाठी वडा पाव विकत घेतल्याचे ही भारतीने सांगितले.

भारती म्हणाली की, मला रडावेसे वाटते.. दुपारी ४ वाजेपर्यंत हर्षने तिला शुभेच्छा न दिल्याने तिने निराशा व्यक्त केली. हर्ष म्हणाला की खूप काही करायचे होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. मात्र, हर्षाने रात्री भारतीच्या सर्व तक्रारी दूर केल्या. त्याने भारतीसाठी फुलांचा गुच्छ आणि केक आणला. यासोबतच स्मार्ट वॉचही भेट म्हणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com