Bharti Singh Golu Photo: भारतीचा 'हॅरी पॉटर' आहे कसला गोड!|Bharti Singh Share son harry potter photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharti Singh Golu Photo

Bharti Singh Golu Photo: भारतीचा 'हॅरी पॉटर' आहे कसला गोड!

Bharti Singh Son Photo Viral: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या हटके स्टाईल आणि वक्तव्यानं नेहमीच सोशल मीडियात चर्चेत राहणारी सेलिब्रेटी म्हणून तिच्या नावाचा उल्लेख करता येईल. काही दिवसांपूर्वी भारती आणि हर्ष लिंबाचीयानं गुड (Bharti Singh And Harsh Limbachiya Photo) न्युज दिली होती. भारतीनं एका मुलाला जन्म दिला होता. बाळंतपणाच्या काही दिवसांपूर्वी ती सेटवर शुटींग जात असल्यानं तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकाही केली होती. पण ऐकेल ती भारती कसली. ती शेवटच्या दिवसांपर्यत शुटवर जात होती. चाहत्यांना तिच्या मुलाची एक झलक पाहायची होती. त्यासाठी त्यांनी भारतीला विनंती केली होती.

भारतीनं इंस्टावरुन आपला मुलगा हॅरी पॉटरचे काही फोटो शेयर केले आहेत. भारती ही सध्या आपल्या मुलासोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सोशल मीडियावर भारतीनं तिच्या मुलाचे फोटो शेयर केले असून त्यानिमित्तानं चाहत्यांशी संवाद देखील साधला आहे. त्या फोटोच्या निमित्तानं भारतीनं आपल्या मुलाचे नावही चाहत्यांना सांगितले आहे. इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंमध्ये भारतीचा हॅरी पॉटर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

भारतीच्या हॅरी पॉटरवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्या फोटोमध्ये भारतीच्या मुलाचा लूक डिक्टो हॅरी पॉटरसारखा दिसतो आहे. त्याच्या डोक्यावर टोपी आहे. त्यानं काळ्या रंगाचा एक चष्माही घातला आहे. त्याच्या हातात छडी आहे. त्या फोटोवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीनं गोलूचा पहिलाच फोटो व्हायरल केला होता. तो पाहून नेटकऱ्यांना कमालीचा भावला होता.

हेही वाचा: Video: मुक्ता बर्वेने मुंबईतल्या घराचा शेअर केला किस्सा

भारती आणि हर्षच्या त्या फोटोंना नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील त्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात गोहर खाननं हॅरीला आशीर्वाद दिला आहे. खूप गोड दिसतो आहे हॅरी असं म्हणून तिनं भारतीला शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यत त्या फोटोंना हजारो कमेंट्स मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Video Viral: ...अन् जखमीच्या संतप्त पत्नीने माजी मुख्यमंत्र्याच्या 'तोंडावर फेकले पैसे'

Web Title: Bharti Singh Share Son Harry Potter Photo Social Media Users Funny Comment Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top