
Bharti Singh: 'मी स्टेजवर होते आणि...', शूटिंगदरम्यान भारतीला प्रसूती वेदना झाल्या होत्या सुरू सांगितला भयानक अनुभव
शानदार कॉमेडी आणि अप्रतिम विनोदबुद्धीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री भारती सिंह हिने गरोदरपणाशी संबंधित तिचे अनुभव शेअर केले आहेत. भारती सिंगने तिच्या गरोदरपणात संपूर्ण ९ महिने काम केले.
आता एका मुलाखतीत भारती सिंहने सांगितले की, जेव्हा तिला लेबर पेन सुरू झाले तेव्हा ती 'खतरा-खतरा' या रिअॅलिटी शोचे शूटिंग करत होती. तिला सेटवरच लेबर पेन होऊ सुरु झाले आणि हे लेबर पेन आहे हे तिला माहीतही नव्हते.
भारती म्हणाली, 'जेव्हा मी खतरा-खतरा करत होते, तेव्हा मला लेबर पेन सुरू झाले. मी स्टेजवर होते, पण पहिली प्रेग्नन्सी असल्याने मला हे लेबर पेन असल्याचे कळले नाही. मला वाटले की या शॉटनंतर मी डॉक्टरांना कॉल करून बोलवते.
शूटिंगदरम्यान सेटवर बराच वेळ उभी राहिल्यामुळे असे होत असावे असे मला वाटले. शूटिंगनंतर मी डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले की मला सतत वेदना होत आहेत. तर लेबर पेन असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर दर 15 मिनिटांनी वेदना सुरू झाल्या.
यानंतरही भारतीने तिचे शूट पूर्ण केले आणि नंतर घरी पोहोचून हॉस्पिटल गाठले. भारतीने सांगितले की, 'तेव्हा सकाळचे ४-५ वाजले होते, त्यामुळे मी आणि हर्षने कोणालाही फोन केला नाही.
आम्ही आमच्या कर्मचारी आणि कुटुंबातील कोणालाही सांगितले नाही. घरातून बॅग उचलली आणि गाडीत बसून हॉस्पिटल गाठलं. यानंतर मी लेबर रूममध्ये गेले. त्यानंतर हर्षने लोकांना सांगितले की, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत.
डिलिव्हरीनंतर अवघ्या 12 दिवसांनी भारतीने काम सुरू केले. यासाठी अनेकांनी तिचे कौतुक केले, तर अनेकांनी काम लवकर सुरू केल्याबद्दल तिला ट्रोल केले.