Bharti Singh: कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या मुलाचा RRR च्या 'नाटू-नाटू'वर जबरदस्त डान्स, पाहा हा गोंडस व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharti Singh

Bharti Singh: कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या मुलाचा RRR च्या 'नाटू-नाटू'वर जबरदस्त डान्स, पाहा हा गोंडस व्हिडिओ

कॉमेड क्वीन भारती सिंहने तिच्या चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा मुलगा गोला डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोलाला RRR च्या ऑस्कर विजेत्या नाटू-नाटू गाण्यावर डान्स करताना दिसला. गोला नाटू-नाटूवर नाचताना खूप आनंदी दिसत आहे.

अशा परिस्थितीत गोलाच्या आईने म्हणजेच भारतीने हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले- 'द एलिफंट व्हिस्परर्स आणि आरआरआरला ऑस्कर मिळाल्याचे 'गोला'ला समजताच तो आनंदी झाला.' हा सुंदर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना अभिनेत्री भारती सिंग तिच्या अभिमानाचे क्षण शेअर करताना दिसली.

भारतीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला. त्याचवेळी सेलेब्सनीही गोलाच्या या डान्सवर कमेंट करत कौतुक केलं. टीव्ही अभिनेत्री गौहर खानने लिहिले- 'माशाल्लाह, क्यूटी पटोटी.' अभिनेत्री निशा अग्रवालनेही प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले- क्यूटी पाई. राजीव अडातिया यांनी कमेंट केली- हा खूप गोंडस आहे.

नुकताच ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. एसएस राजामौली यांचा चित्रपट RRR च्या नाटू-नाटू या गाण्याला ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ऑस्कर प्रदान करण्यात आला. या गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यात हा मान मिळाला. नॉमिनेशनच्या घोषणेदरम्यान या चित्रपटाचे दोन्ही स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर एकत्र बसलेले दिसले. यानंतर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी एकमेकांना आनंदाने मिठी मारली.