Bharti Singh: भारतीला पुन्हा आई व्हायचंय, करीना कपूरकडे व्यक्त केली इच्छा, म्हणाली...

कॉमेडियन भारती एका मुलाची आई आहे. अलीकडेच, करीना कपूरसोबतच्या संभाषणात, अभिनेत्रीने खुलासा केला की तिला पुन्हा आई व्हायचे आहे.
bharti singh
bharti singhSakal

कॉमेडी जगताची 'लाफ्टर क्वीन' म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग तिच्या फनी सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखली जाते. ती तिच्या कॉमिक डायलॉग्सने कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणू शकते. कॉमेडियन असण्यासोबतच भारती एक आई देखील आहे, तिला एक मुलगा गोला आहे. नुकतेच भारतीने तिला पुन्हा आई व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली.

भारती सिंग बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या चॅट शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये पोहोचली, जिथे तिने पुन्हा आई होण्याची इच्छा व्यक्त केली. कॉमेडियनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर करिनासोबतच्या संभाषणाचा एक झलक व्हिडिओ शेअर केला आहे. या संवादात भारती दुसऱ्यांदा आई होण्याबद्दल बोलताना दिसत आहे. ती म्हणते, “मला पुन्हा आई व्हायचे आहे. मला मजा येत आहे." भारतीच्या या बोलण्यावर करीना हसायला लागते.

bharti singh
Mardaani 3: खाकी वर्दी अन् पिस्तुलसह राणी मुखर्जी परतणार, 'मर्दानी 3'बद्दल दिले मोठे अपडेट

भारती सिंगने 2017 मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. गेल्या वर्षी म्हणजे 3 एप्रिल 2022 रोजी वयाच्या 37 व्या वर्षी ती एका मुलाची आई झाली, ज्याला गोला म्हणतात. त्यांनी मुलाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. काल भारतीने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा केला. गोलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

कामासोबतच भारती आपल्या मुलासोबतही वेळ घालवायला विसरत नाही. ती तिच्या मुलाबद्दल व्लॉग शेअर करत असते. गोला आता सर्वात लोकप्रिय स्टार किड्स बनला आहे. त्याच्या निरागसतेकडे करोडो लोक आकर्षित होतात. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com