"भाऊ कदम यांचं पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा"; पाहा भन्नाट व्हिडीओ

bhau kadam
bhau kadam

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून आपल्या विनोदबुद्धीने अभिनेता भाऊ कदमने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्राच्या घराघरात भाऊ कदम परिचित आहे. कार्यक्रमात आपल्या अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भाऊ खऱ्या आयुष्यात मात्र साधाभोळ्या स्वभावाचा आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील त्याचा सहकलाकार कुशल बद्रिकेने नुकताच भाऊचा एक व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कार्यक्रमाची स्क्रिप्ट पाठ करण्यासाठी त्याला देण्यात आली होती. मात्र ते पाठ करता करता भाऊला डुलकी लागली. त्याचाच हा मजेशीर व्हिडीओ कुशलने पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. 

'भाऊ कदम यांचं पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा,' असं कॅप्शन कुशलने या व्हिडीओला दिलं आहे. स्क्रिप्ट पाठ करताना भाऊला झोप लागते. बसल्या बसल्याच डुलकी घेताना तो अचानक जागा होतो. तेव्हा कुशल त्याला म्हणतो, "भाऊ, झोपत का नाहीस आडवा?" त्यावर भाऊ त्याला म्हणतो, "नाही रे, स्क्रिप्ट पाठ करतोय." कुशलने हा व्हिडीओ लपून काढला आहे, हे भाऊला समजतच नाही. या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. भाऊचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

'भाऊ' या नावामागचा रंजक किस्सा
भाऊ कदमचं मूळ नाव भालचंद्र कदम असं आहे. मात्र त्याला सगळे भाऊ या नावानेच ओळखतात. त्याला हे नाव कसं पडलं याबाबत खुद्द त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं. "मी लहान असताना माझी आई मला भाऊ या नावाने हाक मारायची. तेव्हापासून भाऊ असंच नाव सर्वांच्या तोंडी बसलं. माझी ओळख करून देतानाही भाऊ हेच नाव उच्चारू लागले. व्यावसायिक नाटक करतानाही मला भाऊ म्हणूनच हाक मारू लाहले. त्यामुळे आता ते भाऊ कदम असंच नाव कायमचं झालं आहे", असं तो म्हणाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com