esakal | 'नशीबवान'चा ट्रेलर लाँच
sakal

बोलून बातमी शोधा

'नशीबवान'चा ट्रेलर लाँच

'नशीबवान'चा ट्रेलर लाँच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

'कॉमेडीकिंग' भाऊ कदम अभिनित 'नशीबवान'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. अचानक त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी घडते ज्यानंतर त्यांचे नशीब पालटते. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतानाही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. भाऊ यांच्या अभिनयासोबतच खुसखुशीत विनोदही प्रेक्षकांना खदखदून हसवणारे आहेत. चित्रपटात कलाकारांना मेकअप केलेला नाही. भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी या अभिनेत्री चित्रपटात आहेत.

फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, सिनेमाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहेत. सोबतच प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

loading image