विकी कौशलला भू्तानं झपाटलं!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

आता विकी कौशलला भूतानं झपाटलं आहे आणि विकी सुध्दा या भूताला खूप घाबरला आहे! विकीने स्वतः सोशल मिडीयावरुन आपबीती सांगितली आहे.​

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा हीरो दिला, तो म्हणजे विकी कौशल. पण आता या हिरोला भूतानं झपाटलं आहे आणि विकी सुध्दा या भूताला खूप घाबरला आहे! विकीने स्वतः सोशल मिडीयावरुन आपबीती सांगितली आहे.

विकीची ही भीती त्याच्या खऱ्या आयुष्यातील नसून पडद्यावरील भूतानं त्याला झपाटलं आहे. नुकताच विकीच्या आगामी 'भूत' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर विकी एका शिपच्या खिडकीतून बाहेर बघून ओरडत आहे आणि भूताने विकीच्या गळ्याला घट्ट पकडले आहे. विकीने हे पोस्टर ट्विट करत म्हटले आहे की, 'भूत-द हाँन्टेड शिप च्या पहिल्या भागाचे पोस्टर प्रदर्शित करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंह करत आहे. 15 नोव्हेंबर 2019 ला चित्रपट प्रदर्शित होईल.'

vicky kaushal

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. तीन भागात चित्रपट बनणार आहे. याविषयी करण जोहरने सांगितलं आहे की, 'पहिल्यांदाच धर्मा प्रोडक्शन अंतर्गत हॉरर चित्रपट बनत आहे. आम्ही 3 भागात हा चित्रपट बनविणार आहे.'
 

या चित्रपटात भूमी पेडणेकरची सुध्दा महत्त्वाची भूमिका आहे. 2003 ला अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर अभिनित आणि राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भयपटाचे नावही 'भूत' होते.
 

 

vicky kaushal
 

 

 

vicky kaushal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhoot Part One Haunted Ship Films first poster released Vicky Kaushal is terrified