लॉकडाऊनमुळे अभिनेत्री भूमी पेडणेकरवर आली ही वेळ.. घरातंच उगवली मिरची, वांगी आणि स्ट्रॉबेरी..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

लॉकडाऊनच्या काळात भाज्या आणि फळं मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत आहे..त्यामुळे काही सेलिब्रिटींनी तर चक्क घरातंच फळं आणि भाज्या उगवायला सुरुवात केलीये. असंच काहीसं केलंय ते बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्या बाबतीत..

मुंबई- कोरोना व्हायरसच्या महा-रोगराईमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटी घरच्या घरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत..कोणी स्वयंपाक घरात बिझी आहे तर कोणी त्यांच्यातील कलाकाराला जागं करत आवडी निवडींना वेळ देताना दिसतंय. या लॉकडाऊनच्या काळात भाज्या आणि फळं मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत आहे..त्यामुळे काही सेलिब्रिटींनी तर चक्क घरातंच फळं आणि भाज्या उगवायला सुरुवात केलीये..होय, आता जर तुम्हाला सांगितलं की तुमची लाडकी अभिनेत्री घरात भाज्या उगवतेय तर? असंच काहीसं केलंय ते बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्या बाबतीत..

हे ही वाचा: समाजातल्या त्या गडद गोष्टींचं रहस्य उलगडणार अनुष्का शर्मा,  'पाताल लोक' वेबसिरीजचा टिझर रिलीज

लॉकडाऊनमध्ये काही लोकांना घरात राहुन काय करायचं असे प्रश्न पडत आहेत तर काही लोक या लॉकडाऊनंच पुरेपुर उपयोग करुन घेत आहेत..यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर. भूमीने तिच्या घरातंच भाज्यांची आणि फळांची लागवड करायला सुरुवात केली आहे. याचे फोटो सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

After months of tender love & care,we present to you #PednekarKePed  #homegrown #GharKiKheti #sustainableliving

A post shared by Bhumi (@bhumipednekar) on

कोरोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या या लॉकडाऊनचा भूमी पुरेपुर उपयोग करुन घेत आहे. भूमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये मेथी, वांगी, हिरवी मिरची आणि स्ट्रॉबेरी यांचे फोटो दिसत आहेत. भूमी हे फोटो शेअर करण्यासाठी खूप उत्सुक होती याचा अंदाज तिने हे फोटो शेअर करताना जे कॅप्शन दिलंय त्यातून समजून येत आहे.

भूमीने लागवड केलेल्या या भाज्यांचे फोटो शेअर करताना लिहिलंय, ''महिनाभराच्या प्रेम आणि देखभालनंतर आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत..'' भूमीच्या या पोस्टवर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत आणि तिच्या घरातल्या शेतीचं देखील कौतुक करत आहेत. 

Bhumi Pednekar Goes Green Amid Lockdown; From Strawberries To ...

सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, भूमी कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेसोबत पती पत्नी और वो या सिनेमात दिसून आली होती. बॉक्स ऑफीसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. भूमी लवकरंच करण जोहरच्या आगामी तख्त या सिनेमात दिसून येणार आहे. 

bhumi pednekar homegrown strawberry brinjal green chilli 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhumi pednekar homegrown strawberry brinjal green chilli