कपिल शोमधील त्या सायकलची किंमत दहा लाख

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

छोट्या पडद्यावरील शो "द कपिल शर्मा शो'मध्ये ऍक्‍शनचा बादशहा जॅकी चॅन यांच्या उपस्थितीमुळे टॉप ट्रेण्डमध्ये आला. विनोदवीर कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेते जॅकी चॅन आणि सोनू सूद यांनी हजेरी लावली होती. यावेळी जॅकी चॅन आणि सोनू सूदने ज्या सायकलवरून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्या सायकलची तब्बल दहा लाखांना विक्री झाली.

कपिल शर्माने चॅरिटीकरिता या सायकलचा लिलाव केल्याची माहिती एका खासगी वृत्तपत्राने दिली आहे. शेख फाजिल नावाच्या एका प्रेक्षकाने ही सायकल तब्बल दहा लाख रुपयांना विकत घेतली. जॅकी चॅन हे त्यांच्या"कुंग फू योगा'या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आले होते. या एपिसोडचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून कपिलने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरून त्याचा आनंद व्यक्त केला होता. या ट्विटमध्ये त्याने असे म्हटले आहे,"" हे एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. जॅकी सरांना माझ्या शोमध्ये घेऊन येण्यासाठी सोनू तुझे धन्यवाद. खूप सारे प्रेम आणि बेस्ट ऑफ लक.''

जबरदस्त ऍक्‍शन चित्रपट आणि त्यातील प्रात्याक्षिकांसाठी लोकप्रिय असलेल्या जॅकी चॅन यांनी त्यांच्या "कुंग फू योगा' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला दणक्‍यात सुरुवात केली आहे. जॅकी चॅन यांच्या भारतातील प्रसिध्दीमुळे सध्या त्यांचे चाहते भलतेच उत्साहात आहेत. मुंबईत आल्यानंतर जॅकी चॅन यांनी सलमान खानची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा सुंदर फोटो सलमानने ट्विट केला आहे. या फोटोत दोघांच्याही हातात पांडा हे सॉफ्ट टॉय असलेले दिसते.

Web Title: Bicycle Sold For Rs. 10 Lakh On 'The Kapil Sharma Show'