'कौन बनेगा करोडपतीमध्ये काम नाही ; आता थकलोय, विश्रांती घ्यायची '

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका कोणती तर त्यात कौन बनेगा करोडपती असे उत्तर द्यावे लागेल.  

मुंबई - उत्साही, चिरतरुण वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही सतत कार्यरत असणारे अभिनेते अमिताभ जगातील सर्व कलाकारांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांना फॉलो करणारा चाहतावर्ग लाखोंच्या घरात आहे. केवळ चाहतेच नव्हे तर मोठमोठे कलाकारही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात.

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका कोणती तर त्यात कौन बनेगा करोडपती असे उत्तर द्यावे लागेल. गेली दीड दशकाहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. निखळ आनंद दिला. अमिताभ यांचे लक्ष वेधून घेणारे सुत्रसंचालन, त्यांची संवाद साधण्याची हातोटी यामुळे केबीसीनं लक्षावधी प्रेक्षक मिळवला आणि टिकवलाही. अमिताभ यांना पडत्या काळात मोठी साथ केबीसीनं दिली. ते ज्यावेळी एक निर्माता म्हणून बॉलीवूडमध्ये उतरले होते तेव्हा त्यांना अपयश आले. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. पण त्यांना केबीसीनं साथ दिली होती.

Image may contain: 1 person

आता अभिनयाच्या बादशहानं छोट्या पडद्यापासून लांब राहण्याचा निर्धार केला आहे. त्याविषयी माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या केबीसीचा 12 वा सीझन सुरु असून बुधवारी त्या मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आला. त्यानंतर अमिताभ यांनी ब्लॉग लिहून माहिती दिली आहे. अमिताभ यांनी लिहिले आहे की, मी आता फार थकलो आहे. त्यामुळे मला रिटायर व्हायचे आहे. मी आपली सर्वांची माफी मागतो. केबीसीच्या शुटींगचा शेवटचा दिवस फार त्रासदायक आणि मोठा होता. मी कदाचित पुढील एक दोन दिवसांत बरा होईल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ती म्हणजे काम हे काम असते. त्यातून मुक्त झाल्यावर दुस-यानं ते पूर्ण करायचे. त्याला तितक्या गांभीर्यानं घ्यायला हवे.

चाहत्यांनी आतापर्यत भरपूर सहकार्य केले. प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्याविना काहीही शक्य झाले नसते. केबीसीची पूर्ण टीम खूप प्रेमळ आहे. मेहनती आहे. त्यांच्यामुळे हा सर्व प्रवास फार सुखाचा झाला. असे यानिमित्तानं सांगता येईल. 
                                                         
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big b amitabh bachchan no longer be seen kaun banega crorepati i am tired