अरे आवाज कुणाचा ? फक्त मुंबईचा ; सेलिब्रेटीकडून कौतुकाचा वर्षाव 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 11 November 2020

रणवीर सिंह याने गली बॉयच्या गाण्यावर डान्स करुन मुंबईला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आवडत्या संघाचे कौतूक करण्यात अभिनेता अर्जुन कपूरही मागे नाही त्यानेही मुंबईचे अभिनंदन केले आहे.

मुंबई - आयपीएलच्या 13 व्या सत्रातील फायनल वर आपल्या विजयाची मोहोर उमटविणा-या मुंबईवर सध्या सगळीकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळा आयपीएलच्या करंडकावर आपले नाव मुंबईने कोरले आहे. या विजयोत्सवाच्या निमित्ताने त्यांना बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंवर मुंबईच्या संघाचे कौतूक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,  'Yeahhh....मुंबई इंड‍ियन्सचा पाचवा विजय, हे सारं अविश्वसनीय आहे. यावेळी त्यांनी हात उंचावून संघाचे कौतूक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्याबरोबर अभिनेता अभिषेक बच्चन, रणवीर सिंह यांनीही मुंबईच्या संघाच्या विजयावर आनंद साजरा केला आहे. यासगळ्यात अभिषेक बच्चनने शेयर केलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

रणवीर सिंह याने गली बॉयच्या गाण्यावर डान्स करुन मुंबईला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आवडत्या संघाचे कौतूक करण्यात अभिनेता अर्जुन कपूरही मागे नाही त्यानेही मुंबईचे अभिनंदन केले आहे. याशिवाय अली फजल, वरुण धवन, अनिल कपूर य़ांनी रोहितच्या संघावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

 

यातील अनेक सेलिब्रेटींनी यापूर्वी सामन्याच्या वेळी उपस्थित राहून मुंबईचा उत्साह वाढविला होता. यासगळ्यात वरुण धवन, अर्जुन कपूर यांची इंस्टा स्टोरी चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

5 BABY!!! Come on!!!! @mumbaiindians Champions #ipl2020

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

आतापर्यत मुंबईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. यापूर्वी त्यांनी 2013, 2015, 2017, 2019 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले असून अंतिम सामन्यात पराभवाला सामो-या जाव्या लागलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला 12.5 कोटी रुपये मिळाले आहेत. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

CHAMPIONS!!!!! Make that 5 BABY !!!!! @mumbaiindians

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big b Amitabh ranveer abhishek bollywood celebs react on mumbai indians win