बिग बींचे मराठी बोल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

आपल्या सगळ्यांना "सरकार' मधला सुभाष नागरे आठवत असेलच. त्याच्या कपाळावरचे गंध, त्याच्या डोळ्यातील कणखरपणा, केवळ एकेका वाक्‍यातून चित्रपटाला मिळणारी कलाटणी आणि मुख्य म्हणजे या चित्रपटातील संगीत. ही "सरकार' चित्रपटाची खासियत. तब्बल आठ वर्षांनंतर सुभाष नागरे लोकांच्या कल्याणासाठी परत येत आहे. तेही आणखी कणखर स्वरूपात. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला "सरकार 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन आपल्याला मराठीत बोलताना दिसणार आहे. हा ट्रेलर 1 मार्चला रिलीज होणार आहे.

आपल्या सगळ्यांना "सरकार' मधला सुभाष नागरे आठवत असेलच. त्याच्या कपाळावरचे गंध, त्याच्या डोळ्यातील कणखरपणा, केवळ एकेका वाक्‍यातून चित्रपटाला मिळणारी कलाटणी आणि मुख्य म्हणजे या चित्रपटातील संगीत. ही "सरकार' चित्रपटाची खासियत. तब्बल आठ वर्षांनंतर सुभाष नागरे लोकांच्या कल्याणासाठी परत येत आहे. तेही आणखी कणखर स्वरूपात. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला "सरकार 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन आपल्याला मराठीत बोलताना दिसणार आहे. हा ट्रेलर 1 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मराठीत अनेक दमदार संवाद त्यांच्या खर्जातील आवाजात म्हटले आहेत. याआधी आलेल्या "सरकार' आणि "सरकार राज' या चित्रपटांतही त्यांनी मराठीत काही छोटे संवाद म्हटले होते. या चित्रपटातही असेच अनेक डायलॉग ते मराठीत म्हणणार आहेत. 
या चित्रपटात अमिताभ बच्चनबरोबर मनोज वाजपेयी, रोनित रॉय, अमित साध, यामी गौतमी, जॅकी श्रॉफ, रोहिणी हट्टंगडी ही बडी कलाकार मंडळी आहे. राम गोपाल वर्मा यांचा "सरकार 3' हा "सरकार' सीरिजमधला चित्रपट 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Big B marathi bol