मुंबई : बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा हा होतच असतो. त्यातच आता घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे आणि या ड्रामामध्ये अधिकच भर पडली आहे. वादाला नवे तोंड फुटले आहे आणि शोमध्ये नवीव ट्विस्टही आला आहे. वाइल्ड कार्डने घरामध्ये गेलेल्या 'हिंदूस्तानी भाऊ' ची चर्चा सर्वत्र पाहायला मिळतेय. दरम्यान घरामध्ये दिलेल्या टास्कमुळे घरातील सदस्यांमधील वादाला वेगळेच रुप धारण झाले. सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज हे दोघं भिडले आणि चर्चेला उधाण आले आहे.
सिद्धार्थ आणि रियाज खरंतर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पण घरामध्ये सिद्धार्थ आणि रियाज या दोघांच्या रागावरचा ताबा सुटला आहे. सिद्धार्थ दिवसेंदिवस रागीट होत आहे आणि कुठेतरी रियाज त्याचा फायदा उठवत त्याला भांडणासाठी प्रवृत्त करत आहे. त्यामुळे दोन मित्रांमध्ये वैर निर्माण होताना दिसत आहे. या भांडणाचा व्हिडीओ कलर्स टीव्हीने आपल्या इनस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या भांडणावर आता बिग बॉसची 4 ची सदस्य डॉली बिंद्राने ट्विट करत आसिम आणि रियाजवर निशाणा साधला आहे.
हे ट्विट करताना डॉलीने लिहिलं, ' जेलसी (मत्सर) बाळगणे खरच खूप खतरनाक आजार आहे, गेट वेल सुन (लवकर बरे व्हा). हे ट्विट आसिम तुमझ्यासाठी आहे, लवकर बरा हो. कालच्या एपिसोडमध्ये मित्रासाठीच द्वेष दिसून आला.' अशाप्रकारे घडलेल्या प्रकाराबद्दल बिग बॉसची एक्स सदस्य डॉलीने आपलं मत परखडपणे व्यक्त केलं आहे.
घरामध्ये झालेल्या या तडाक्याच्या भांडणात रियाजने शिवीगाळ करत अपशब्दांचा वापर केला, त्यामुळे सिद्धार्थ आणखी चिडला आहे. आजच्याही एपिसोडमध्येही ही भांडणं चालुच राहणार असल्याचं दिसत आहे. या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला आहे. पारस छाबडा आणि त्याच्या टीमला याचा फायदा झाला. शहनाज गीलने वैयक्तिक टास्कमध्ये पारसच्या टीमला जिंकवण्यात मदत केली. सिद्धार्थ आणि आसिम यांनी भांडणाच्या सर्व सिमा पार केल्या आहेत. आता हे बघावं लागेल, या सर्व प्रकारावर बिग बॉस कशाप्रकारची अॅक्शन घेतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.