'राखीचं सेलिब्रेशन म्हटल्यावर दणका तर होणारच' 

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 1 March 2021

बिग बॉसचा यंदाचा सीझन जरी संपला असला तरी त्याचे सेलिब्रेशन अद्याप सुरु आहे.

मुंबई -  यंदाच्या बिग बॉसमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली ती राखी सावंत. भलेही ती यावेळच्या सीझनची विजेती झाली नसेल मात्र तिनं सर्वांची पसंती मिळवली आहे. बिग बॉसला मोठ्या उंचीवर नेवून ठेवण्यात तिचा वाटा सर्वाधिक होता. त्यावरुन तिनं काहीवेळा प्रेक्षकांची बोलणीही खाल्ली. तिला मोठ्या टिकेला सामोरंही जावं लागलं. अशावेळी राखी मागे हटली नाही. तिनं आपला खाक्या दाखवून कार्यक्रमाचा टीआरपी वाढवला.

बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये राखीला 4 थ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सध्या सध्या राखीच्या पार्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात स्पर्धेची विजेती रुबीना दिलेक, तिचा पती अभिनव शुक्ला उपस्थित नसल्याने त्याविषयी चर्चा रंगली होती.

बिग बॉसचा यंदाचा सीझन जरी संपला असला तरी त्याचे सेलिब्रेशन अद्याप सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रूबीनाचे सेलिब्रेशनही सर्वांच्या चर्चेचा विषय होते. बिग बॉसमध्ये राखीनं शो एंटरटेनर म्हणून वेगळी लोकप्रियता मिळवली होती.

राखीच्या पार्टीमध्ये राहुल महाजन, बिंदु दारा सिंह, सोनाली फोगाट उपस्थित होते. राखी बिंदुला आपला मोठा भाऊ मानते. तर सोनाली आणि तिची मैत्री सर्वपरिचित आहे. पार्टीच्या सुरुवातीला राखीनं केक कापला. त्यानंतर तिला भेटण्यासाठी जान कुमार सानु, निक्की तांबोळीही पोहचले.

Bigg Boss 14: Rakhi Sawant reveals the real reason why she went on the  Salman Khan show

राखी ही बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये टॉप 5 स्पर्धकांमधील एक अशी स्पर्धक होती. तिनं 14 लाख रुपये घेऊन त्या स्पर्धेतून ती बाहेर पडली होती. यावर बोलताना राखीनं असं सांगितलं होत की, ते सगळे पैसे ती आपल्या आईच्या इलाजासाठी वापरणार आहे. तिला रुग्णालयाचे बिल भरायचे आहे.

अभिनव आणि रूबीना या पार्टीला न आल्यानं राखी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र राखीकडे पाहिल्यावर तसे काही जाणवत नाही. तिनं तिची पार्टी एंजॉय केल्याचे दिसते आहे. बिंदू दारा सिंह, कश्मिरा शाह, संभावना सेठ सारख्या सेलिब्रेटींचाही राखीला पाठींबा मिळत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss 14 contestant rakhi Sawant throw a after party with celebrities